Loading...
Katar

कटार सिंह

माजी संचालक, इन्स्टिट्युट ऑफ रुरल मॅनेजमेंट, आणंद (आयआरएमए), गुजरात.

कटार सिंह सध्या, इंडिया नॅचरल रिसोर्स इकॉनॉमिक्स अँड मॅनेजमेंट (INREM) फाऊंडेशन, आणंद येथे मानद (संस्थापक) अध्यक्ष आहेत. ही नैसर्गिक संसाधन अर्थशास्त्र आणि पर्यावरण व्यवस्थापनाचे शिक्षण, प्रशिक्षण व संशोधनास प्रोत्साहन देण्यात आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन धोरणे आणि कार्यक्रमांतील सुधारणांसाठी कार्यरत असलेली एक बिगर शासकीय शैक्षणिक संस्था आहे. त्यांनी इलिनॉय विद्यापीठ, अर्बना-शॅम्पेन, यूएसए येथून कृषी अर्थशास्त्रामध्ये पीएचडी केली आहे आणि ओरेगॉन राज्य विद्यापीठ, कॉर्व्हलिस, यूएसए आणि इंडियाना युनिव्हर्सिटी ब्लूमिंग्टन, यूएसए येथील पॉलिटिकल थिअरी आणि पॉलिसी अॅनॅलिसिस कार्यशाळेत, कृषी व संसाधन अर्थशास्त्र विभाग येथून नैसर्गिक संसाधन अर्थशास्त्रामध्ये पदव्युत्तर संशोधन आणि प्रगत अभ्यासकार्य केले आहे. शेती आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात तसेच नैसर्गिक संसाधन अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन या क्षेत्रात त्यांना शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि सल्ला देण्याचा ५० हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. ग्रामीण विकास संस्था,(IRMA) आणंद, भारत येथे ते संचालक आणि रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक होते, तसेच बँकर्स इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंट (BIRD), लखनौ येथे त्यांनी अल्पकाळ संचालक म्हणूनही काम पाहिलेले आहे. जी.बी. पंत कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, पंतनगर येथेही त्यांनी अध्यापनाचे काम केलेले आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी निधी प्रदान केलेल्या अनेक संशोधन व सल्लागार प्रकल्प त्यांनी समन्वित व संयोजित केले आहेत. लेखनाची दांडगी आवड असल्याने, त्यांचे १२० हून जास्त लेख आणि माहितीपर लेख प्रख्यात व्यावसायिक जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत आणि नऊ पुस्तकांमध्ये त्यांनी सहलेखन केले आहे, यामध्ये पाठ्य पुस्तकांचाही समावेश होतो. ग्रामीण विकास: तत्त्वे, धोरणे व व्यवस्थापन, दुसरी आवृत्ती (सेज, १९९९) आणि पर्यावरणीय अर्थशास्त्र: सिद्धान्त व उपयोजन (सेज, २००७), या दोन पुस्तकांमध्ये डॉ. अनिल शिशोदिया यांच्यासह त्यांनी सहलेखन केले आहे. त्यांनी तीन पुस्तकांचे सह-संपादनही केले आहे, ती पुस्तके आहेत: नैसर्गिक साधनसंपत्तीचे सहकारी व्यवस्थापन (सेज, १९९६), नैसर्गिक साधनसंपत्तीचे अर्थशास्त्र: सिद्धान्त आणि भारतातील उपयोजन (१९९७) आणि ग्रामीण विकास संघटनांची रचना व व्यवस्थापन करणे (२०००). प्राध्यापक सिंह हे अनेक व्यावसायिक मंडळांचे आजीव सभासद आहेत, यामध्ये इंडियन सोसायटी ऑफ अॅग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स (ISAE), इंडियन सोसायटी फॉर इकॉलॉजिकल इकॉनॉमिक्स आणि इंटरनॅशनल सोसायटी फॉर इकॉलॉजिकल इकॉनॉमिक्स यांचा समावेश होतो. विश्व भारती विद्यापीठ, शांतीनिकेतन यांच्याकडून ग्रामीण विकासाच्या शिक्षणातील ठळक योगदानासाठी रथिंद्र पुरस्कार २००३, कृषी आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रातील त्यांच्या असामान्य संशोधन कार्यासाठी सीएसएस हरियाणा कृषी विद्यापीठ, हिस्सार यांच्याकडून दिला जाणारा १९९६–९७ चा सर छोटु राम राष्ट्रीय पुरस्कार या पुरस्कारांसह त्यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळालेले आहेत.