Loading...

थॉमस पंथम

एम एस युनिव्हर्सिटी ऑफ बडोदा, बडोदा

थॉमस पंथम हे पूर्वी बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात प्राध्यापक होते. १९८५-८६ मध्ये यूजीसी नॅशनल लेक्चरर ऑफ पोलिटिकल सायन्स या सन्मानासाठी त्यांचे नाव सुचवण्यात आले होते. युनिव्हर्सिटी ऑफ इसेक्समध्ये ते अभ्यागत व्याख्याते होते (१९७३). तसेच युनिव्हर्सिटी ऑफ प्रिन्स्टन अँड मॅसॅच्युसेट्समध्ये (१९८१) ते अभ्यागत व्याख्याता होते. नियतकालिकांमध्ये त्यांनी अनेक लेख लिहिले आहेत, अनेक ग्रंथांचे संपादन केले असून, पोलिटिकल पार्टीज अँड डेमोक्रॅटिक कन्सेन्सस हे पुस्तक लिहिले आहे.