Loading...
Hedwig

हेडविग लेविस

शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक

हेडविग लेविस हे शिक्षणतज्ज्ञ आणि लेखक असून, त्यांनी व्याख्याता आणि प्राचार्य म्हणूनही काम पाहिले आहे. १९९३मध्ये त्यांना नवी दिल्लीतील अखिल भारतीय ख्रिस्ती उच्चशिक्षण संघटनेकडून (एआयएसीएचई) रेव्हरंड टी. ए. मथियास इनोव्हेटिव्ह टीचर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांची विविध विषयांवरील आजवर ३० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अध्यात्म, उपासना, कौशल्य विकास, चरित्रे, प्रेरणादायी विचार, इतिहास इत्यादी विषयांचा यात समावेश होतो. त्यांची अॅट होम विथ गॉड (१९९१), हॅपिनेस मॅन्युफॅक्चरर्स (२००१), मिरर्स ऑफ लाइफ (१९९८), वन्स अपॉन अ टाइम (२०१०), फन विथ वर्ड्स (१९८३), आणि गुजरात जेजुइट्स रिमेम्बर्ड (२००२) इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांची काही पुस्तके स्पॅनिश तसेच लिथुआनियन भाषेत, तसेच काही भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाली आहेत. बॉडी लँग्वेज या पुस्तकाची या आधीची आवृत्ती मल्याळम् भाषेत अनुवादित झाली आहे. फादर लेविस हे ख्रिश्चन धर्मगुरू आहेत. सेंट झेवियर कॉलेज, अहमदाबाद येथे त्यांची संपर्क साधता येऊ शकतो. त्यांची वेबसाइट : http://joygift.tripod.com