Loading...
Walter

वॉल्टर व्हिएरा

माजी अध्यक्ष, इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ मॅनेजमेंट कन्सल्टिंग इन्स्टिट्युट्स (आयसीएमसीआय)

वॉल्टर व्हिएरा हे सन १९७५मध्ये स्थापन झालेल्या मार्केटिंग अॅडव्हायझरी सर्व्हिसेस ग्रुपचे अध्यक्ष आहेत. त्यापूर्वी त्यांनी १४ वर्षे एवढा प्रदीर्घ काळ वेगवेगळ्या प्रतिथयश कंपन्यांमध्ये नोकरी केली. या कंपन्यांमध्ये ग्लॅक्सो, वार्नर लँबर्ट आणि बूट्स यांचा समावेश होतो. ते प्रमाणित व्यवस्थापन सल्लागार तर आहेतच पण इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कन्सल्टंटस ऑफ इंडियाचे फेलो देखील आहेत. भारतभरातील तसेच जगभरातील वेगवेगळ्या कंपन्या आणि व्यावसायिक संस्थांचे ते प्रशिक्षण, व्यवसाय तसेच विक्री आणि पणनविषयक धोरणे यासंदर्भातील सल्लागार आहेत. भारतातील विविध प्रख्यात व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थांमध्ये वॉल्टर व्हिएरा यांनी शिकवलेले आहे. त्यांनी जे. एल. केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंट, नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी, ड्रेक्सेल बिझनेस स्कूल, फिलाडेल्फिया आणि कॉर्नेल स्कूल, झारागोसा, स्पेन अशा अनेक ख्यातनाम संस्थांमध्ये व्याख्याने दिलेली आहेत. सन १९९३मध्ये रोममध्ये, सन १९९६मध्ये योकोहामा येथे आणि सन १९९९मध्ये बर्लिन येथे भरलेल्या वर्ल्ड कॉंग्रेस ऑफ मॅनेजमेंट कन्सल्टन्टसला संबोधित करण्यासाठी त्यांना पाचारण केले गेले होते. ते कॅन्सर एड, वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड आणि कन्झ्युमर एज्युकेशन अँड रिसर्च कौन्सिल यासारख्या संस्थांचे सोशल मार्केटिंग करून त्यांना अधिकाधिक लोकप्रिय बनवण्यासाठीदेखील क्रियाशील आहेत. सन १९८७ ते सन १९९२ या काळात वॉल्टर व्हिएरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कन्सल्टंटस ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते. सन १९८९-९० मध्ये ते एशिया पॅसिफिक कॉन्फरन्स ऑफ मॅनेजमेंट कन्सल्टन्टसचे संस्थापक अध्यक्ष झाले. नंतर सन १९९७ ते सन १९९९ या काळात ते इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ मॅनेजमेंट कन्सल्टिंग इन्स्टिट्यूटस, युएसए या जागतिक पातळीवरील सर्वोच्च संस्थेचे अध्यक्ष होते. वॉल्टर व्हिएरा यांनी लिहिलेले ९००० हून अधिक लेख व्यवसाय जगताशी संबंधित आणि इतर सर्वसाधारण प्रकाशनांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. ते जर्नल ऑफ मॅनेजमेंट कन्सल्टंटस, युएसएच्या सल्लागार मंडळाचे सदस्य सुद्धा आहेत. वॉल्टर व्हिएरा यांनी एकूण ११ पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यातील तीन पुस्तके त्यांनी सी. नोर्थकोटे, पार्किन्सन आणि एम. के. रुस्तमजी यांच्याबरोबर सहलेखाक म्हणून लिहिलेली आहेत. त्यांच्या सर्वात अद्ययावत पुस्तकांमध्ये ‘द न्यू सेल्स मॅनेजर’ आणि ‘सक्सेसफुल सेलिंग’ या पुस्तकांचा समावेश होतो. वॉल्टर व्हिएरा यांना सन २००५ मध्ये भारतात सल्ला क्षेत्रात केलेल्या भरघोस कामगिरीसाठी लाईफटाईम अचिव्हमेंट अॅवॉर्ड फॉर कन्सल्टिंग इन इंडिया हा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. सन २००९मध्ये त्यांना लाईफटाईम अचिव्हमेंट अॅवॉर्ड फॉर मार्केटिंग इन इंडिया या जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. वॉल्टर व्हिएरा यांचे नाव युरोपमधील च्या जागतिक पातळीवरील वक्त्यांच्या यादीत आहे. पणन या विषयाचे जागतिक पातळीवरील गुरु फिलीप कोटलर वॉल्टर व्हिएरा यांचे वर्णन पणन या विषयावरील आशियामधील सर्वोत्तम वक्त्यांपैकी एक वक्ते असे करतात. वॉल्टर व्हिएरा यांच्याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी waltervieira.com या वेबसाईटला भेट द्यावी किंवा waltervieira@gmail.com यावर इमेलद्वारे संपर्क साधावा.