Loading...
Sukhadeo

सुखदेव थोरात

भारतीय सामाजिक शास्त्र संशोधन परिषद (आयसीएसएसआर); प्राध्यापक, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ

सुखदेव थोरात हे भारतीय सामाजिक शास्त्र संशोधन परिषदेचे (आयसीएसएसआर) अध्यक्ष; विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) माजी अध्यक्ष; आणि नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. याशिवाय इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ दलित स्टडीजचे माजी संचालक, आयोवा स्टेट विद्यापीठाचे अभ्यागत विषयतज्ज्ञ आणि वॉशिंग्टनमधील इंटरनॅशनल फुड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्युट या संस्थेत रिसर्च असोसिएट म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यांना सन २००८मध्ये साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाकरिता पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी आजवर १० पेक्षा अधिक पुस्तके आणि अनेक शोधनिबंध लिहिले आहेत. शेतीविकास, ग्रामीण दारिद्र्य, संस्थात्मक आणि आर्थिक वृद्धी, अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती यांसारख्या वंचित घटकांच्या समस्या, जातिव्यवस्थेतील अर्थशास्त्र, जातिभेद आणि वंचित घटकांच्या समस्या, जातिभेद आणि दारिद्र्य, मानव विकास, मानवी हक्कविषयक समस्या, गलिच्छ वस्त्या हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख विषय आहेत.