Loading...
Anil

अनिल शिशोदिया

इन्फर्मेशम/रेफरन्स सर्विसेस, डिपार्टमेंट ऑफ द कॅलगरी पब्लिक लायब्ररी, कॅलगरी, कॅनडा

अनिल शिशोदिया सध्या कॅलगरी, कॅनडा येथे कॅलगरी सार्वजनिक ग्रंथालयामध्ये माहिती/संदर्भ सेवा विभागात काम करतात. ते पूर्वी सरदार पटेल विद्यापीठ (SPU), वल्लभ विद्यानगर, गुजरात येथे अर्थशास्त्र पदव्युत्तर विभागात वरिष्ठ व्याख्याता होते. ऑगस्ट १९९९ ते मे २००० या कालावधीमध्ये कोलोरॅडो राज्य विद्यापीठ, फोर्ट कॉलिन्स, यूएसए येथे पर्यावरणीय अर्थशास्त्रामध्ये ते जागतिक बँक पदव्युत्तर संशोधन फेलो होते, येथे त्यांनी पर्यावरणाच्या नीतीमत्तांवरील अभ्यासक्रमासह नैसर्गिक संसाधने आणि पर्यावरणीय अर्थशास्त्रावर अनेक प्रगत अभ्यासक्रम तयार केले व त्यांचे लेखापरीक्षणही केले. SPU मध्ये पर्यावरणीय अर्थशास्त्रामध्ये पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रम तयार करणे व देऊ करणे यामध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. अध्यापन व संशोधनात त्यांना ११ वर्षांहून जास्त अनुभव आहे आणि या विषयावर त्यांनी अनेक लेख प्रकाशित केले आहेत.