Loading...

बिद्युत चक्रवर्ती

प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, दिल्ली विद्यापीठ

बिद्युत चक्रवर्ती हे सध्या भारतातील दिल्ली विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते दिल्ली विद्यापीठातील सामाजिकशास्त्र विभागाचे अधिष्ठाता व राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स; इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), कोलकाता; मोनाश युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रेलिया; नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर आणि हॅम्बर्ग युनिव्हर्सिटी, जर्मनी या काही प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमध्ये अध्यापन केले आहे. डॉ. चक्रवर्ती यांनी सेज इंडिया या प्रकाशनसंस्थेकरता इंडियन गव्हर्नमेंट अॅण्ड पॉलिटिक्स (सहलेखक राजेंद्र कुमार पांडे, २००८) आणि मॉडर्न इंडियन पॉलिटिकल थॉट (सहलेखक राजेंद्र कुमार पांडे, २००९) ही दोन पुस्तके लिहिली आहेत.