Loading...

कांचा अइलैय्या

मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ, तेलंगाना, प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, उस्मानिया विद्यापीठ

कांचा अइलैय्या हे एक तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक असून ते उस्मानिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. भारतीय जातीव्यवस्थेच्या विरोधातील वैचारिक चळवळीत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे, तसेच त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर दलित-बहुजन प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यांचा जन्म एका कुरुम गोल्ल (एक ‘इतर मागासवर्गीय जात’) कुटुंबात झाला होता आणि ते एका छोट्याशा दक्षिण भारतीय शहरात लहानाचे मोठे झालेले आहेत. ते एक बहुप्रसवलेखक असून त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत तसेच ते नियमितपणे राष्ट्रीय पातळीवरील वृत्तपत्रांमध्ये तसेच नियतकालिकांमध्ये लेख लिहीत असतात. व्हाय आय एम नॉट अ हिंदू—अ शूद्र क्रिटिक ऑफ हिंदुत्व फिलॉसॉफी, कल्चर अँड पोलिटीकल इकॉनॉमी (१९९६) हे त्यांचे पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहे. त्याबरोबरच त्यांच्या प्रकाशित पुस्तकांमध्ये गॉड अॅज अ पोलिटीकल फिलॉसॉफर: बुद्धाज चॅलेंज टू ब्राह्मनीझम, द स्टेट अँड रिप्रेसिव्ह कल्चर, मानतत्वम (तेलुगुमध्ये), बफेलो नॅशनॅलिझम: अ क्रिटिक ऑफ स्पिरिच्युअल फॅसिझम, टर्निंग द पॉट, टिलींग द लँड: डिग्निटी ऑफ लेबर इन अवर टाईम्स आणि द वेपन ऑफ द अदर: दलित-बहुजन रायटिंग्ज अँड द रिमेकिंग ऑफ इंडियन नॅशनलिस्ट थॉट यांचाही समावेश होतो.