Loading...

नागमणी राव

माजी वरिष्ठ अध्यापक, कर्वे समाजसेवा संस्था, पुणे

नागमणी राव ह्या गेली २१ वर्षे विकासाच्या क्षेत्रात काम करत आहेत आणि कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसमध्ये अध्यापन करत होत्या. १९७८ पासून त्या महिला आंदोलनाच्या संघटन, संशोधन आणि प्रशिक्षण कार्यात सहभागी झाल्या आहेत. त्यांनी स्त्रियांचे प्रश्न, ग्रामीण कष्टकरी तसेच सामाजिक कार्यकरणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षित करण्यासंबंधी शैक्षणिक लेख या विषयांवर विस्तृतपणे लेखन केले आहे. त्या संशोधन आणि सामुदायिक विकास संस्थांबरोबर सल्लागार होत्या आणि त्या महिलांशी संबंधित संशोधन प्रकल्प, सामुदायिक विकास, शासकीय विभागांची कार्यात्मक समीक्षा आणि संपूर्ण साक्षरता मोहीम या विषयीच्या संशोधन प्रकल्पात त्यांचा बराच सहभाग असतो. त्यांनी वरिष्ठ सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, अशासकीय कार्यक्षेत्रीय कर्मचारी (NGO FieldStaff), शेतकी शास्त्र आणि अभियांत्रिकीच्या व्यावसायिक विद्यार्थ्यांसाठी, महाविद्यालयीन शिक्षक आणि विकास व्यावसायिक यांच्यासाठी विकसन व संशोधन या क्षेत्रातील प्रशिक्षण आयोजित केलेले आहे.