Loading...

उज्ज्वला मसदेकर

अध्यापक, कर्वे समाजसेवा संस्था, पुणे

उज्ज्वला मसदेकर गेल्या काही वर्षांपासून कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस संस्थेत अध्यापक आहेत. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची योजनांसाठी आंतरराष्ट्रीय संस्थांद्वारे निधी गोळा केलेल्या विविध प्रकल्पांवर लिंग तज्ज्ञ (जेंडर एक्सपर्ट) आणि सल्लागार म्हणून त्यांनी काम केले आहे. स्त्रियांसाठी बचतगट व पतपुरवठा गटात सामील असलेल्या स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करण्याचा त्यांना व्यापक अनुभव आहे. त्यांनी विविध संशोधन अभ्यासांचे आयोजन केले आहे. त्या अभ्यासासाठी किबी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ, जपान, महिला आणि बालविकास मंत्रालयाचे महाराष्ट्र सरकार, महिला आर्थिक विकास महामंडळ (एमएव्हीआयएम), युनिसेफ यांच्याद्वारे निधी दिला जातो. त्यांनी स्वयंसेवी संस्थांकरिता आणि संघर्ष-निवारण, ग्रामीण भागात पिण्याचे पाणी आणि स्वच्छता कार्यक्रमातील सहभाग यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे लिहिली आहेत. त्या वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांकरिता लैंगिक संवेदनशीलता आणि समानतेवर प्रशिक्षक आहेत आणि एमएव्हीआयएमच्या पातळीवर प्रशिक्षक आहेत.