Loading...
Pam

पॅम डेनिकोलो

माजी प्राध्यापक (मानद), सनदी मानसशास्त्रज्ञ, रीडिंग विद्यापीठ

प्रोफेसर पॅम डेनिकोलो हे सनदी विधायक मनोवैज्ञानिक आहेत. त्यांनी उच्च शिक्षणातील संशोधानासंदर्भात 'शिकणे' व 'शिकवणे' या दोन्ही प्रक्रियांत अधिक मोलाची भर घालण्याच्या दृष्टीने जबाबदारी स्वीकारली आहे व हे काम करताना पदव्युत्तर विद्यार्थी, त्यांचे पर्यवेक्षक व आपले व्यवहार विकसित करण्याच्या प्रयत्नात असलेले इतर व्यावसायिक, यांच्या गरजांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना व सुरुवातीच्या व्यावसायिक संशोधकांना मदत करण्याचे त्यांचे वेड डॉक्टरेट पदवीच्या अनेक यशस्वी उमेदवारांमधे बघायला मिळते. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमधे त्यांचे हे समर्पित काम बघायला मिळते - यू. के. काउन्सिल फॉर ग्रॅज्युएट एज्युकेशन, इंटरनॅशनल स्टडी अ‍ॅसोसिएशन ऑन टीचर्स अ‍ॅण्ड टीचिंग, द सोसायटी फॉर रिसर्च इन्टु हायर एज्युकेशन पोस्ट ग्रॅज्युएट नेटवर्क, द इम्पॅक्ट अ‍ॅण्ड इव्हॅल्यूएशन ग्रुप अ‍ॅण्ड अदर वर्किंग ग्रुप्स ऑफ व्हिटाए (vitae) अ‍ॅण्ड द क्यूएए डॉक्टोरल कॅरॅक्टरीस्टिक्स अ‍ॅडवायझरी ग्रुप, या ठिकाणी त्यांची अनेक सादरीकरणे, कार्यशाळा झालेल्या आहेत. डॉ. ल्यूसिंडा बेकर या युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगमध्ये इंग्रजी भाषा व साहित्य विभागात फेलो व बक्षिस मिळवलेल्या वरिष्ठ प्राध्यापिका आहेत. त्यांनी आपल्या करीयरची एक महत्त्वाची जबाबदारी म्हणून स्नातकपूर्व विद्यार्थी व पदव्युत्तर संशोधनाचे विद्यार्थी यांची गुणवत्ता वाढवण्याचे काम केले आहे. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात प्रावीण्य मिळवून देणारी अनेक यशस्वी मार्गदर्शक पुस्तके लिहिली आहेत. एक व्यावसायिक प्रशिक्षक म्हणून त्या इंग्लंड व युरोपात काम करतात. विशेषतः वकील, अभियंता आणि शास्त्रज्ञांसाठी संपर्क व प्रशासन तंत्राच्या प्रशिक्षणाची तयारी व प्रशिक्षण देण्याचे काम त्या करतात. पॅम व सिंडी यांनी अनेक वर्षे उत्साहाने एकत्र काम केले आहे. तसेच 'युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंग'मध्ये प्रकाशनाचे व विकासाचे काम केले आहे. तिथल्या संशोधन-पद्धती, प्रजातीय कौशल्ये आणि डॉक्टरेटच्या परीक्षकांचे प्रशिक्षण यामध्ये महत्वाचे योगदान त्यांनी दिले आहे.