Loading...
Prakash

प्रकाश चंद

सहायक प्राध्यापक, राज्यशास्त्र विभाग, दयाल सिंह (ई) महाविद्यालय, दिल्ली विद्यापीठ

प्रकाश चंद हे सध्या भारतातील दिल्ली विद्यापीठाच्या अखत्यारितील दयाळ सिंग (ई) महाविद्यालयात राज्यशास्त्राचे अध्यापक आहेत. इंडियन सोशल सायन्स रिव्ह्यू, गांधी मार्ग, इंडियन जर्नल ऑफ पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशन आणि अर्बन इंडिया अॅण्ड सोशल चेंज या संशोधन नियतकालिकांमध्ये त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. लोकप्रशासन आणि भारतातील पर्यावरणीय अभिशासन ही त्यांच्या अभ्यासाची व संशोधनाची क्षेत्र आहेत. अरिंदम रॉय हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील बरद्वान विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ‘ग्रामपंचायतींमध्ये स्त्रियांचा सहभाग’ आणि ‘विकासोद्भव विस्थापन’ यासारख्या अनेक शासकीय प्रकल्पांमध्ये त्यांनी काम केले आहे. ‘शहरी प्रशासनावर जागतिकीकरणाचा परिणाम’, ‘दहशतवादः राज्यव्यवस्था ही काही सज्जन नाही’, आणि वैद्यकीय बहुजनवाद आणि लघुदृष्टीसंबंधी सार्वजनिक आरोग्य: मेमरी-१ मधील अडथळ्याचा अभ्यास (बरद्वान, पश्चिम बंगाल)’ असे त्यांचे विविध साहित्य प्रकाशित झाले आहे. सध्या ते ‘भारतातील सामाजिक-सांस्कृतिक विविधतेचा आरोग्यविषयक सेवांवरील परिणाम: बरद्वान जिल्ह्याचा (पश्चिम बंगाल) प्रातिनिधिक अभ्यासः १९९१-२००९’ यावर कार्य करत आहेत. लोकप्रशासन आणि राजकीय सिद्धान्त हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.