Loading...
 Pankaj

पंकज टण्डन

बॉस्टन विद्यापीठ, बॉस्टन

पंकज टण्डन हे बॉस्टन युनिव्हर्सिटी येथे सहयोगी प्राध्यापक आहेत. त्यांनी 1979 मध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटी येथून अर्थशास्त्र विषयातील पीएचडी पदवी प्राप्त केली. ते सेंट स्टीफन्स कॉलेज आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथील पदवीधर आहेत, जिथे ते 1973 सालचे सुवर्णपदक विजेते होते. ते 1978 पासून बॉस्टन युनिव्हर्सिटी येथे शिकवत आहेत. तिथे त्यांना अध्यापनासाठीचे दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत. व्यष्टीय अर्थशास्त्रीय सिद्धान्त, परिव्यय-लाभ विश्लेषण, सार्वजनिक उद्योगांचे अर्थशास्त्र, तांत्रिक बदलाचे अर्थशास्त्र, अर्थशास्त्रज्ञांसाठीच्या गणितीय पद्धती, अर्थशास्त्रीय संख्याशास्त्र, माहितीचे अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र आणि कमी विकसित देशांचे अर्थशास्त्र या क्षेत्रांमध्ये त्यांना रस आहे. द वेल्फेअर कॉनसिक्वेन्सेस ऑफ सेलिंग पब्लिक एंटरप्रायजेस: अॅन एम्परिकल अॅनालिसिस (1994) आणि सेलिंग पब्लिक एंटरप्रायजेस: अ कॉस्टबेनिफिट मेथडॉलॉजी (1990) या पुस्तकांचे ते सहलेखक आहेत. त्यांनी वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्यासाठी सल्लागार म्हणून काम केले आहे.