Loading...
Gangadhar

गंगाधर जोशी

माजी संचालक, सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंट (एसआयओएम), नाशिक

सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंटचे (एसआयओएम) (२००५-०८) माजी संचालक गंगाधर जोशी हे सध्या गंगाधर जोशी अँड असोसिएट्सचे मुख्य सल्लागार आहेत. ही बहुविद्याशाखीय व्यवस्थापन मार्गदर्शन, शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी संस्था पुणे येथे कार्यरत आहे. श्री.जोशी मेकॅनिकल इंजिनियर (१९७१) आहेत. त्याचबरोबर त्यांनी मास्टर्स इन इंडस्ट्रीयल इंजिनियरींग (१९७५) केले आहे. भारतातील आणि परदेशातील खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील कामाचा प्रचंड अनुभव असणारे जोशी शासन आणि उद्योगांना पातळीवर पुढील विषयांवर धोरणात्मक सल्ला देण्याचे काम करत आहेत - बदल व्यवस्थापन कार्यक्रमांचा विकास/ अंमलबजावणी, संस्थात्मक मजबूतीकरण, व्यवसायाची पुनर्रचना, उत्पादन खर्चातील कपात, टाकाऊ घटकांचे प्रमाण कमी करणारे उत्पादन (लीन मॅन्युफॅक्चरिंग), मनुष्यबळ नियोजन, व्यवस्थापन विकास आणि कामगिरी व्यवस्थापन. व्यावसायिक धोरणाचा विकास व अंमलबजावणी यांविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन आणि सल्ला देण्याचे काम ते करत आहेत. गेल्या काही वर्षांत त्यांनी उच्च पातळीवरील व वरिष्ठ व्यवस्थापकांसाठी धोरणात्मक नियोजन, उत्पादकता व्यवस्थापन, संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन, बदल व्यवस्थापनाचे नेतृत्व, आयएसओ ९००० प्रमाणन आणि अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे व्यवस्थापन या विषयांवरील कार्यशाळा विकसित केलेल्या आहेत. तसेच त्या कार्यशाळांचे आयोजनही केले आहे. जोशी यांनी २००५ साली सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ ऑपरेशन्स मॅनेजमेंटचे (एसआयओएम) संस्थापक संचालक म्हणून संस्थेचे प्रमुखपद स्वीकारले आणि जेमतेम ३ वर्षांच्या कालावधीत जागतिक स्तराशी सुसंगत व्यवस्थापकीय साधनसंपत्ती उपलब्ध करून देणारा- उद्योगविश्वाच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल असा विश्वासार्ह स्रोत म्हणून उद्योगविश्व त्यांना ओळखू लागले. या भरीव पायाच्या आधारे एसआयओएमने कार्यात्मक गुणवत्ता समर्थ करण्याच्या आपल्या कार्यात पुढे आणखी प्रगती केली.