Loading...
Madhuri

माधुरी बोस

लेखिका, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वकील

माधुरी बोस या कलकत्त्यामध्ये जन्मल्या व वाढल्या. त्या अमियनाथ आणि ज्योत्स्ना बोस यांचे द्वितीय अपत्य, शरदचंद्र बोस यांची नात आणि त्यांचे कनिष्ठ बंधू असलेल्या सुभाषचंद्र बोस यांच्या नातपुतणी आहेत. भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या प्रतिष्ठित बोसबंधुंविषयी आपले वडील अमिय यांनी सांगितलेल्या आठवणी या माधुरी यांचा बालपणीचा ठेवा होता व त्याच आठवणी या पुस्तकाचे उगमस्थान आहेत. माधुरी यांनी कलकत्ता विद्यापीठ आणि जादवपूर विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे ‘ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीज’ या संस्थेमधून पदव्युत्तर संशोधन पूर्ण केले. मानवाधिकार वकील म्हणून तीन दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जिनिव्हातील आंतरराष्ट्रीय मजूर संघटना, पूर्व आफ्रिकेतील संयुक्त राष्ट्रांचे विकास कार्यक्रम आणि लंडन येथील राष्ट्रकुल सचिवालय येथे काम केले आहे. आपल्या व्यावसायिक कारकिर्दीमध्ये माधुरी यांनी मानवाधिकाराशी संबंधित विषयांवर विपुल लेखन केले असून आफ्रिका, आशिया आणि युरोपातील देशांमध्ये प्रवासही केला आहे.