Loading...
Avinash

अविनाश किरपाल

माजी उपाध्यक्ष, टाटा इंटरनॅशनल लि.

अविनाश किरपाल यांनी १९६२मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी टाटाच्या प्रशासकीय सेवेत जवळजवळ तीस वर्षे काम केले. तिथे त्यांनी टाटा ग्रुपसाठी नवी दिल्ली येथे पब्लिक अफेअर्स ऑफिसर, टाटा एक्सपोर्ट लिमिटेडसाठी कॉर्पोरेट प्लॅनिंग मॅनेजर आणि टाटा इंटरनॅशनल लिमिटेडचे उपाध्यक्ष अशा विविध पदांवर काम केले. नंतर ते वर्ल्ड फेडरेशन ऑफ ट्रेडिंग असोसिएशन्स, मॉन्ट्रिअलचे सेक्रेटरी जनरल बनले. गेली दहा वर्षे ते आयएमआय (इंटरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट)च्या प्रोग्रॅमस फॉर डेव्हलेपमेंट ऑफ स्मॉल अँड मिडियम साइज्ड एंटरप्रायजेस या अभ्यासक्रमासाठी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. याच बरोबरीने आयएमआयचे त्रैमासिक इंटरफेसचे संपादक म्हणूनही ते काम पाहतात. आयएमआयमध्ये त्यांनी वर्ल्ड बँक, इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशन, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम, इंटरनॅशनल ट्रेड सेंटर आणि इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन यांच्यासाठी लघु उद्योजक विकासाच्या क्षेत्रामधील सल्ला देण्याचे अनेक आंतरराष्ट्रीय उपक्रम केले. त्यांच्या लिखाणामध्ये इंटरनॅशनल ट्रेड सेंटर, जिनिव्हा यांनी प्रकाशित केलेले दी एसएमई अँड दी एक्सपोर्ट डेव्हलेपमेंट कंपनी या पुस्तकाचा तसेच या पुस्तकाच्या फ्रेंच आणि स्पॅनिश भाषेतील आवृत्त्यांचा समावेश आहे. ते या पुस्तकाचे सहलेखक आहेत. तसेच व्यवस्थापकीय नियतकालिकांमध्ये आणि मासिकांमध्ये त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. जुने अभिरुचीपूर्ण चित्रपट पाहणे व प्रवास करणे हे त्यांचे छंद आहेत. त्यांनी कामासाठी आणि आवड म्हणून साठपेक्षा जास्त देशांची भ्रमंती केली आहे.