Loading...
Praveenkumar

प्रवीणकुमार मेल्लल्ली

सहायक प्राध्यापक, लोकप्रशासन अभ्यास विभाग, म्हैसूर विद्यापीठ, म्हैसूर

श्री प्रवीणकुमार मेल्लल्ली यांनी २००८मध्ये कर्नाटक विद्यापीठ, धारवाडमधून आपले बी.एससी.चे (पीसीएम) शिक्षण पूर्ण केले , पण आपल्या आजूबाजूच्या वातावरणातील सामाजिक-आर्थिक समस्यांनी त्यांना एक मुलकी सेवक होण्यास प्रवृत्त केले आणि त्याकरिता त्यांनी २०१२मध्ये कर्नाटक राज्य विद्यापीठ, म्हैसूरमधून लोकप्रशासन या विषयामध्ये एम.ए. पूर्ण केले. पण ते सनदी अधिकारी बनू शकले नाहीत. मग त्यांनी एक प्रतिष्ठित प्राध्यापक आणि सामाजिक शास्त्रज्ञ होण्याचा निर्धार केला. त्याकरिता त्यांनी विविध सामाजिक शास्त्र विषयांचा अभ्यास केला. त्यातही भारतीय संविधानात त्यांना विशेष स्वारस्य होते. त्यांनी ऑनलाइन माध्यमातून काही प्रतिष्ठित विद्यापीठांमधून आपले उच्च शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले , जसे – टोकियो विद्यापीठ, जपान; मिशिगन विद्यापीठ, जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ आणि व्हर्जिनिया विद्यापीठ; यूएसए. २०१४मध्ये त्यांची श्रीकृष्ण इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी, बंगळुरू या संस्थेत सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात झाली आणि त्या अंतर्गत ते व्हीटीयू, बेळगावी या संस्थेतील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटना, व्यावसायिक नीतिमूल्ये आणि मानवी हक्क (CPH) हे विषय शिकवू लागले. याच कालावधीत त्यांनी हे पुस्तक लिहिले . हे सेज प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेले त्यांचे पहिले पुस्तक होते, ज्याने त्यांना अनेक देशांत एक लक्षणीय तरुण लेखक म्हणून ख्याती मिळवून दिली. त्यांनी अनेक जर्नल्स आणि लेखदेखील प्रकाशित केले . तसेच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आपले शोधनिबंध सादर केले . २०१५पासून, ते म्हैसूर विद्यापीठ, मानसगंगोत्री, म्हैसूर येथे लोकप्रशासन अभ्यास विभागामध्ये मानद सहायक प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. आपण त्यांच्याशी 47praveen@gmail.com वर संपर्क साधू शकता.