Loading...

अलका वाडकर

माजी अध्यापक, मानसशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ

अलका वाडकर यांची संपूर्ण शैक्षणिक कारकीर्द अत्यंत उज्ज्वल होती. त्यांनी मानसशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी आणि पीएच. डी. शिक्षण पूर्ण केले असून अनेक पुरस्कार आणि शिष्यवृत्त्या प्राप्त केल्या आहेत. अध्यापन, संशोधन आणि सामाजिक कार्यातील समृद्ध अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातील मानसशास्त्र विभागात साधारण ३० वर्षे मानसशास्त्राचे अध्यापन केलेले आहे. पीएच. डी., एम. फिल., एम. एड. आणि एम. ए.च्या संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना गेली ३० वर्षे त्या यशस्वी मार्गदर्शन करत आहेत. डॉ. वाडकर या त्यांच्या सामाजिक विषयांवरील पुस्तकांसाठी ओळखल्या जातात. त्यांनी पंधरा पुस्तकेलिहिली आहेत आणि सामान्यजनांसाठी त्यांनी लिहिलेल्या विचारप्रवर्तक, संशोधनावर आधारित पुस्तकांसाठी त्यांना सात राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या विद्यापीठांसाठी सहा पाठ्यपुस्तकेलिहिली आहेत. त्यांनी प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विषयांवर ७५ शोधनिबंध प्रसिद्ध आणि सादर केले आहेत. त्यांनी पाच संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत आणि विश्वकोष, शासकीय प्रकाशने, आकाशवाणी, वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिकेव वार्षिक प्रकाशनांसाठी त्या मागील ३0 वर्षांपासून लेख लिहीत आहेत. डॉ. वाडकर विविध शैक्षणिक संस्थांसाठी आणि शासकीय संस्थांसाठी कार्यशाळांचे आयोजन, व्याख्याने यासाठी नियमितपणे तज्ज्ञ म्हणू न कार्यरत असतात. तसेच मानव संसाधन केंद्र, बहिःशाखा, यशदा (शासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी संस्था), पोलीस प्रशिक्षण केंद्र इत्यादी संस्थांमध्येप्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठीही त्या तज्ज्ञ म्हणू न काम पहात आहेत. सर्व शिक्षा अभियान, अंगणवाडी आणि महिला व मुलांच्या कल्याणासाठी आयोजिल्या जाणाऱ्या तत्सम इतर शासकीय कार्यक्रमांत त्यांनी लक्षणीय योगदान दिले आहे. विविध विद्यापीठांमधील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आणि एम. फिल. व पीएच. डी.च्या प्रबंधांच्या मूल्यमापनाचे काम त्या अनेक वर्षे करत आहेत. डॉ. वाडकर भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या विविध परीक्षांसाठी मागील २३ वर्षांपासून काम करत आहेत. दिव्यांग लोकांसाठी काम करणाऱ्या विविध संस्था आणि इतर शैक्षणिक संस्थांसाठी त्या काम करत आहेत. त्या एका शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या विश्वस्त आहेत आणि दिव्यांग विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांचे विनामूल्य समुपदेशन त्या करतात.