Loading...
Alice W.

अॅलिस डब्ल्यू. क्लार्क

अॅलिस डब्ल्यू. क्लार्क या इतिहासतज्ज्ञ आणि भारतातील लिंग आणि समाज या विषयाच्या अभ्यासक आहेत. त्यांनी सांता क्लारा विद्यापीठासहित सान फ्रान्सिस्को बे एरिया येथील अनेक विद्यापीठांमध्ये इतिहास आणि स्त्रियांचा अभ्यास शिकवला आहे. नुकत्याच त्या कॅलिफोर्निया– बर्कले विद्यापीठाच्या विस्तारित ऑनलाइन विभागात “भारतीय संस्कृती” या विषयाच्या अध्यापिका होत्या. विस्कोन्सिन विद्यापीठातून तौलनिक जागतिक इतिहास या विषयावर पीएच.डी. पूर्ण केल्यानंतर त्यांनी पोस्टडॉक्टरल शिष्यवृत्तीसाठी लोकसंख्या या विषयात भारतीय स्त्रियांचे प्रश्न हा विषय घेतला. त्यांनी विविध देशांमध्येवैविध्य आणि स्त्रियांचे प्रश्न यावर सल्लेदिले आहेत, बऱ्याच ठिकाणी त्यांना व्याख्याने देण्यासाठी आमंत्रित केले गेले आहे. त्यांनी भारतामध्ये दीर्घकाल वास्तव्य केले आहे. आपल्या अनमोल व्यावसायिक मुली, नातवंडे आणि पतीच्या सहाय्याने त्या वैयक्तिकदृष्ट्यासुद्धा सामाजिक पुनर्निर्माणामध्ये उतरल्या आहेत. फावल्या वेळात त्यांना समुद्रकिनारी राहायला, निसर्गात फिरायला, संवाद साधायला आवडते. त्यांना लोकसंगीत, वाचन आणि कला संग्रहालये आणि प्रदर्शने यांना भेट द्यायची आवड आहे.