Loading...
Sameer

समीर दुआ

संस्थापक आणि सीईओ, इन्स्टिट्युट फॉर जनरेटिव्ह लीडरशिप, पुणे

"समीर दुआ जगभरातील लोकांचे आयुष्य बदलण्यासाठी वचनबद्ध आहेत आणि या जगातील प्रत्येकाला आनंद, यश आणि अनन्यसाधारण यश मिळण्याची शक्यता आहे असा त्यांना विश्वास आहे. लोक जेणेकरून आनंद, यश आणि परिपूर्णतेने भरलेले आयुष्य जगतील यासाठी, त्यांना आयुष्यात खरेच काय आवडते हे जाणून घेण्यासाठी आणि प्राप्त करण्यासाठी ते त्यांना आधार देतात. व्यवस्थापन शिक्षणामधील २४ वर्षांच्या अनुभवासह, पदव्युत्तर पदवीधार असलेल्या समीर यांनी भारतात आणि लंडन, यूके येथे संस्था उभारल्या आहेत आणि चालवल्या आहेत. त्यांनी १९९०च्या दशकाच्या सुरुवातीला शैक्षणिक केंद्रांचे विस्तृत जाळे उभारले, तेव्हा भारतामध्ये अशी कल्पनाही कुणी ऐकलेली नव्हती. त्यांनी ५२ देशांमधील सहभागींबरोबर उपक्रमात काम केले आहे आणि दर्जेदार ब्रिटिश, अमेरिकी आणि युरोपियन विद्यापीठांबरोबर काम केले आहे. समीरच्या संस्थेद्वारे दिल्या जाणाऱ्या व्यवस्थापन अभ्यासक्रमाचा भाग म्हणून त्यांनी निरनिराळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या वरिष्ठ/मध्यम स्तराच्या व्यवस्थापकांचे प्रशिक्षण व विकास करण्यासाठी काम केले आहे. समीर हे आयजीएल, यूएसएबरोबर भागीदारीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या आयजीएल, इंडियाचे संस्थापक संचालक आणि प्रोग्राम लीडर आहेत. समीर यांनी झिग झिग्लर कॉर्पोरेशनमधून प्रशिक्षण देण्याचे प्रमाणपत्र घेतले आहे आणि त्यांनी अनेक उच्च दर्जाचे प्रशिक्षण अभ्यासवर्ग घेतले आहेत, तसेच त्यांनी अनेक संस्थांमधील नेत्यांना त्यांची सर्वोत्तम क्षमता गाठण्यासाठी आणि त्यांची ध्येये साध्य करण्यासाठी यशस्वीपणे प्रशिक्षण दिले आहे. समीर कोचिंग आणि प्रशिक्षणासाठी परिवर्तनीय दृष्टिकोनाचा वापर करतात आणि त्यांनी - द न्यूफील्ड नेटवर्क, यूएसए, या जगातील आघाडीच्या आँटॉलॉजिकल कोच ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून आँटॉलॉजिकल कोच प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. समीरनी आतापर्यंत निरनिराळ्या उद्योगांमधील आणि निरनिराळ्या आकारांच्या संस्थांबरोबर अनेक प्रशिक्षण, कोचिंग आणि सल्लागार प्रकल्प केले आहेत. समीर यांच्या क्लायंटमध्ये मर्सिडिझ-बेंझ, सिमेन्स, जॉन डिरी, बीएमसी सॉफ्टवेअर, कॉस्मॉस को-ऑपरेटिव्ह बँक, बेनेट, कोलमन अँड कंपनी लि. (द टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप), ऑलस्क्रिप्ट्स, पर्सिस्टंट सिस्टिम्स, अॅमडॉक्स, टेक महिंद्रा, दाना, कारगिल, कॉग्निझंट, आणि इतर अनेक कंपन्यांचा समावेश होतो. समीर यांना मुख्य वक्ते म्हणून व्याख्यान देण्यासाठी सातत्याने आमंत्रणे येत असतात, आणि ते व्यावसायिक कार्यालये, इंडस्ट्री कन्सोर्टियम आणि बिझनेस क्लबमध्ये भाषण नियमितपणे देत असतात, तसेच अलीकडेच त्यांना मुंबईमध्ये टीईडीएक्स इथे व्याख्यानासाठी आमंत्रण देण्यात आले होते, त्या ठिकाणी त्यांनी विराम जाहीर करण्यावर व्याख्यान दिले. समीर हे आशियातील एका उच्च स्थानावरील आणि आघाडीच्या बिझनेस स्कूलचे सल्लागार होते. ते हायर एज्युकेशन फोरमचे बंगळूरू केंद्राचे संस्थापक चेअरमन होते, तसेच ते इमर्जिंग प्रेसिडेंट्स ग्रुपचे व्हाइस चेअरमन होते. जगभरात लाखो लोकांच्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम करण्याच्या समीर यांच्या उद्देशाच्या अनुषंगाने, त्यांनी गिफ्ट युवर ऑर्गन फाउंडेशन स्थापन केली आहे. भारतामध्ये अवयवाच्या अभावी कोणाचाही मृत्यू होऊ नये अशी गिफ्ट युवर ऑर्गन फाउंडेशनचे संस्थापक आणि मुख्य प्रेरक म्हणून समीर यांची दृष्टी आहे. गिफ्ट युवर ऑर्गन फाउंडेशन ही कर्नाटक तसेच महाराष्ट्र सरकारबरोबर काम करते आणि ग्रीन हार्ट ड्रायव्हर्स परवाना सुरू करणारी ही भारतामधील पहिली संस्था आहे, याद्वारे चालकाच्या परवान्यावर अवयवदानाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या एका कृतीमध्ये भारतामधील अवयवदानाच्या परिस्थितीमध्ये संपूर्ण बदल घडवण्याची ताकद आहे. समीर यांना वक्ते म्हणून आमंत्रण देण्यासाठी, किंवा तुमच्या संस्थेमध्ये ‘विराम जाहीर करण्याचा’ उपक्रम आयोजित करण्यासाठी, किंवा इतर कोणत्याही शंकेसाठी, तुम्ही sameer@sameerdua.com या ईमेल आयडीवर ईमेल करू शकता."