Loading...
Peter

पीटर गोंसाल्विस

सेलेसिअन पॉण्टिफिकल युनिव्हर्सिटी, रोम

पीटर गोंसाल्विस, पीएच.डी., हे सध्या सेलेसिअन पॉण्टिफिकल युनिव्हर्सिटी, रोम येथे संप्रेषण शास्त्रांचे अध्यापन करतात. त्यांनी अहमदनगर येथील बॉस्को ग्रामीण विकास केंद्रात ग्रामीण विकास समुदाय कार्यकर्ता म्हणून आपल्या माध्यमातील कारकिर्दीची सुरुवात केली. दक्षिण आशियामध्ये जीवनाधारित शिक्षणविषयक जनजागृती व्हावी याकरता तेज-प्रसारिणी, मुंबई, या बहुमाध्यमिक निर्मिती केंद्राची स्थापना केली आहे. त्यांनी ‘क्वालिटी लाईफ एज्युकेशन’, या शिक्षक-प्रशिक्षण हस्तपुस्तिकांची मालिका प्रचारात आणली. यापैकी एक्सर्साइजेस इन मीडिया एज्युकेशन (१९९४) आणि एक्सर्साइजेस इन पीस एज्युकेशन (२००३) या दोन हस्तपुस्तिकांचे लेखन गोंसाल्विस यांनी केले आहे. डॉ. गोंसाल्विस हे तरुणाईचा समग्र विकास याकरता समर्पित कार्य करणाऱ्या ऑल इंडिया डॉन बॉस्को एज्युकेशनल सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थेचे सभासद आहेत. शांतता मार्गावरील संवादकाच्या सिग्निस (SIGNIS) या जागतिक संघटनेची एक शाखा असलेल्या INTERSIG चे अध्यक्ष होते. त्यांच्या गांधींवरील इतर लेखनामध्ये खादी: गांधीज्‌ मेगा सिम्बल ऑफ सब्वर्जन (सेज २०१२), आणि गांधी ॲण्ड द पोप्स - फ्रॉम पायस टू फ्रॅन्क्सिस या ग्रंथांचा समावेश होतो.