Loading...
Aditya

आदित्य मुखर्जी

ऐतिहासिक अभ्यास केंद्र, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली, भारत

आदित्य मुखर्जी हे नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) सेंटर फॉर हिस्टॉरिकल स्टडीज् विभागामध्ये ‘समकालीन भारतीय इतिहास’ या विषयाचे प्राध्यापक आहेत. त्याचप्रमाणे, ते जेएनयूमधील स्कूल ऑफ सोशल सायन्सेसचे अधिष्ठाता व जेएनयूमधील जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीज् या संस्थेचे संचालक होते. मुखर्जी हे अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना येथील ड्यूक युनिव्हर्सिटीमध्ये आणि इटलीमधील ला सपेन्झा , युनिव्हर्सिटी ऑफ रोम येथे अभ्यागत प्राध्यापक होते. १९९९–२००० या काळात ते टोकियो युनिव्हर्सिटीमध्ये जपान फाउंडेशनचे विद्यावृत्तीधारक म्हणून कार्यरत होते. तसेच ते यू.के. मधील लॅँकास्टर, फ्रान्समधील नान्तेस आणि ब्राझीलमधील साओ पाओलो येथील इन्स्टिट्यूट्स ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीज येथेही विद्यावृत्तीधारक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या पुस्तकांमध्ये इंपिरियलिझम, नॅशनॅलिझम अँड दि मेकिंग ऑफ दि इंडियन कॅपिटालिस्ट क्लास (२००२), इंडिया सिन्स इंडिपेंडन्स (२००८) आणि इंडियाज् स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स (१९८८) आदींचा समावेश आहे. सेजच्या आधुनिक भारतीय इतिहास या विषयावरील मालिकेतील लेखनाचे संपादन ते करत असून या मालिकेत आतापर्यंत १८ प्रबंध निर्माण झाले आहेत.