Loading...
Mridula

मृदुला मुखर्जी

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली , भारत

मृदुला मुखर्जी या नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील सेंटर फॉर हिस्टॉरिकल स्टडीज् विभागामध्ये ‘आधुनिक भारतीय इतिहास’ या विषयाच्या प्राध्यापिका, जेएनयूमधील स्कूल ऑफ सोशल सायन्सेसच्या अधिष्ठाता आणि नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी या संस्थेच्या संचालिका होत्या. त्या १९८६ साली अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना येथील ड्यूक युनिव्हर्सिटीमध्ये आणि १९९९–२००० या काळात ते टोकियो युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यागत अभ्यासक होत्या. तसेच फ्रान्सच्या नान्तेसमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीज येथेही विद्यावृत्तीधारक म्हणून कार्यरत होत्या. पिझन्ट्स इन इंडियाज् नॉन-व्हॉयलंट रिव्हॉल्युशन (२००४), कॉलनियलायझिंग अॅग्रिकल्चर:दि मिथ ऑफ पंजाब एक्सेप्शनॅलिझम (२००५), इंडिया सिन्स इंडिपेंडन्स (२००८) आणि इंडियाज् स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स (१९८८) आदी त्यांची महत्त्वाची प्रकाशित पुस्तके आहेत. सेजच्या आधुनिक भारतीय इतिहास या विषयावरील मालिकेतील लेखनाचे संपादन त्या करत असून या मालिकेत आतापर्यंत १८ प्रबंध निर्माण झाले आहेत.