Loading...
Sucheta

सुचेता महाजन

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली , भारत

सुचेता महाजन या नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील सेंटर फॉर हिस्टॉरिकल स्टडीज् विभागामध्ये आधुनिक भारतीय इतिहास या विषयाच्या प्राध्यापक असून त्या या विभागाच्या तसेच जेएनयूमधील पी. सी. जोशी अर्काइव्ह्ज ऑन कंटेपररी हिस्ट्री या विभागाच्या अध्यक्ष होत्या . त्यांनी दिल्ली विद्यापीठामध्येही अध्यापन केले आहे आणि यूएसएच्या ओहियोमधील वूस्टर कॉलेजमध्ये त्या अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या . सिमला येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडीज् या संस्थेच्या त्या विद्यावृत्तीधारक होत्या. इटलीतील बेलेजिओ येथेही रॉकफेलर विद्यावृत्तीधारक आणि आयर्लंडच्या डब्लिनमधील ट्रिनिटी कॉलेजमध्ये त्या स्पेक्ट्रेस विद्यावृत्तीधारक म्हणून कार्यरत होत्या. विसाव्या शतकातील भारताचा इतिहास आणि राजकारण या विषयावर त्यांचे आतापर्यंत विपुल साहित्य प्रकाशित झाले आहे. त्यांच्या महत्त्वाच्या प्रकाशित पुस्तकांमध्ये इंडिपेंडन्स अँड पार्टिशन: दि इरोजन ऑफ कॉलनियल पॉवर इन इंडिया (२०००), इंडियाज् स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स (१९८८) (बिपन चंद्र आणि इतर यांच्यासह सहलेखन), राइट्स ऑफ पॅसेज : ए सिव्हिल सर्व्हंट रिमेंबर्स : एच.एम. पटेल (२००५) आणि एज्युकेशन फॉर सोशल चेंज: एमव्हीएफ अँड चाइल्ड लेबर (२००८) इत्यादींचा समावेश आहे. टूवर्ड्‌स् फ्रीडम या मालि केतील १९४७ च्या खंडातील तीन भागांचे संपादनही त्यांनी केले आहे. यापैकी दोन भाग २०१३ व २०१५ मध्ये प्रकाशित झाले असून तिसरा भाग लवकरच प्रकाशित होणार आहे. इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च यांनी ही मालिका प्रायोजित केली आहे.