Loading...
Rakhahari

राखहरि चटर्जी

राज्यशास्त्रातील यु.जी.सी मानद सदस्य, कलकत्ता विद्यापीठ, कोलकाता

राखहरि चटर्जी (पीएच.डी., शिकागो) हे कलकत्ता विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विषयाचे प्राध्यापक आणि कला विभागाचे अधिष्ठाता होते. ते शिकागो विद्यापीठामध्ये फुलब्राईट स्कॉलर (१९७०–७१), सोशल सायन्स रिसर्च काऊन्सिल फेलो (१९७३–७५) आणि फुलब्राईट पोस्ट-डॉक्टरल व्हिजिटिंग फेलो (१९८६–८७) होते. तसेच ते अँन आर्बर येथील मिशिगन विद्यापीठामध्ये फोर्ड फाऊंडेशन व्हिजिटिंग फेलो (१९८८–८९), चार्लट्सव्हिले येथील व्हर्जिनिया विद्या पीठामध्ये फुलब्राईट अमेरिकन रिसर्च फेलो (१९९६–९७) आणि युजीसी एमिरटस फेलो (२००९–११) देखील होते. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये मेथड्स ऑफ पॉलिटिकल एन्क्वायरी, वर्किंग क्लास अँड द नॅशनॅलिस्ट मुव्हमेंट इन इंडिया, इंट्रोडक्शन टू कम्पॅरिटिव्ह पॉलिटिकल अॅनालिसिस या पुस्तकांचा समावेश आहे. अनेक खंडांच्या संपादनासोबतच त्यांनी अनेक शैक्षणिक नियतकालिकांसाठी तसेच वृत्तपत्रांसाठी ९० पेक्षा जास्त शोधनिबंध लिहिले आहेत. त्यांच्या शैक्षणिक भेटींमध्ये हाइडेलबर्ग विद्यापीठ, चायना इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीज, पेकिंग विद्यापीठ, फ्युदान विद्यापीठ आणि युनान अॅकॅडमी ऑफ सोशल सायन्सेस यांचा समावेश आहे. सध्या ते ऑब्झर्वर रिसर्च फाऊंडेशन, कोलकता येथे सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.