Loading...
Sanjay

संजय कुमार

संचालक, सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस ), दिल्ली

भारतीय युवा आणि निवडणुकीय राजकारण हे पुस्तक भारतीय युवावर्ग आणि देशातील निवडणुकीय राजकारण यांच्यातील महत्त्वपूर्ण संबंधाचा अभ्यास करते. अनेक प्रसंगोचित प्रश्नांची उत्तरे पुस्तक देते: उमेदवार तरुण असण्याचा युवा मतदारांवर प्रभाव पडतो का? तरुण उमेदवार निवडणुकीस उभा राहिल्यास युवा वर्ग मतदानाबाबत अधिक उत्साही असतो का? प्रचलित कल्पनांच्या विरोधात असे दिसून येते, की भारतीय युवावर्गाचा निवडणुकीय राजकारणात रस वाढला आहे ;मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या वेळेस कमी सहभागच असलेला दिसून येतो. हे पुस्तक राजकीय समस्यांच्या युवावर्गास असलेल्या जाणिवेच्या पातळीचा अभ्यास करत तरुणांचा निवडणुकीय राजकारणाकडे वाढत कल आणि सहभाग यांचे विश्लेषण करते. तसेच ते हेही निदर्शनास आणते, की राजकारणात भविष्य घडवू पाहणाऱ्या युवावर्गाची फार मोठी टक्केवारी असणार आहे. तरीही , लिंग, स्थान आणि त्याचप्रकारचे इतर सामाजिक घटक यांसोबत युवा मतदारांची रुची आणि निवडणुकीय सहभाग यांच्या पातळीत अंतर जाणवते.