Loading...
Prasanna K.

प्रसन्न के. मोहंती

अर्थशास्त्राचे चेअर प्रोफेसर, हैदराबाद विद्यापीठ

भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९७९च्या तुकडीतील अधिकारी असणारे प्रसन्न के. मोहंती आंध्र प्रदेश शासनाचे मुख्य सचिव होते. त्यांच्या शैक्षणिक पदव्या पुढीलप्रमाणे आहेत. एम. ए. (अर्थशास्त्र), दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स एम. ए. (राजकीय अर्थव्यवस्था) आणि नागरी अर्थशास्त्रातील पीएच. डी. (बोस्टन विद्यापीठ) तसेच, ते हार्वर्ड विद्यापीठात संशोधनोत्तर अधिछात्रही होते. डॉ. मोहंती यांनी अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय स्थानांवर काम केले आहे. यात विशाखापट्टणम् आणि हैदराबाद महानगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी व दंडाधिकारी, गुंटुर, हैदराबाद अर्बन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचे उपाध्यक्ष, सेंटर फॉर गुड गव्हर्नन्सचे महासंचालक, हैदराबाद आणि आंध्र प्रदेश शासनाच्या जमीन प्रशासन विभागाचे मुख्य आयुक्त आणि संचालक, नागरी विकास तसेच, भारत शासनाच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण मोहिमेचे (JNNURM) मोहीम संचालक, या पदांचा समावेश आहे. नागरी अर्थशास्त्र आणि शहर व्यवस्थापन क्षेत्रातील दीर्घ संशोधन आणि प्रशासकीय कौशल्यामुळे डॉ. मोहंती भारतातील नागरी प्रशासन आणि वित्त यातील सुधारणांमधील योगदानासाठी ओळखले जातात. सध्या ते हैदराबाद विद्यापीठात अर्थशास्त्राचे चेअर प्रोफेसर असून,रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संचालक मंडळात संचालक आहेत.