Loading...

पारमिता मुखर्जी

सहयोगी प्राध्यापक, इण्टरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (आयएमआय), कोलकाता

पारमिता मुखर्जी या कोलकाता येथील आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन संस्थेमध्ये अधिष्ठाता (शैक्षणिक) आणि प्राध्यापक (अर्थशास्त्र) म्हणून कार्यरत आहेत. त्या कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजच्या माजी विद्यार्थिनी आहेत. कोलकाता येथील इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट येथून त्यांनी संख्यात्मक अर्थशास्त्रात एम.एस. केले आणि कोलकाता येथील जाधवपूर विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच.डी. पूर्ण केले. त्यांना औद्योगिक, संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा 20 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी ए.सी. निल्सन (पूर्वीचे ओआरजी एमएआरजी), आयसीआरए आणि इतर व्यावसायिक केंद्रांमध्ये काम केले आहे. त्या अर्थशास्त्र, सांख्यिकी, व्यापार विश्लेषण, वित्तीय अर्थमिति यांसारख्या विषयांचे अध्यापन करतात. ऊर्जाक्षेत्रात प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे आणि सल्लागार म्हणून काम करण्याचा त्यांना अनुभव आहे. आय.एम.आय. कोलकाताच्या आय.एम.आय. कनेक्टच्या त्या संपादक आहेत. उपयोजित वित्तीय अर्थशास्त्र आणि अर्थमिति हे त्यांचे संशोधनाचे विषय आहेत. वित्तक्षेत्र, स्थूलअर्थशास्त्र आणि सार्वजनिक वित्ताशी संबंधित सद्यकालीन काही प्रश्नांवर त्यांनी काम केले आहे. रिसोर्सेस पॉलिसी, अप्लाईड फायनान्शीयल इकॉनॉमिक्स, इमर्जिंग मार्केट फायनान्स अॅण्ड ट्रेड यांसारखी नियतकालिके, पुस्तके आणि इकॉनॉमिक अॅण्ड पॉलिटिकल विकली यांसारख्या आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. भारत आणि कॅथलिक युनिव्हर्सिटी, ल्युव्हेन, बेल्जिअम; बोरसा इस्तंबूल, तूर्की; नॅशनल तैवान युनिव्हर्सिटी; सिचुआन अकॅडमी ऑफ सोशल सायन्सेस, चायना आणि युनिव्हर्सिटी ऑफ सोफिया अॅन्टीपॉलीस, नाईस, फ्रान्स येथे झालेल्या अनेक परिषदा आणि परिसंवादांमध्ये त्यांनी संशोधनात्मक लेखन सादर केले.