Loading...

अर्णब के. देब

सहयोगी प्राध्यापक, इण्टरनॅशनल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (आयएमआय), कोलकाता

अर्णब के. देब हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन संस्था, नवी दिल्ली येथे सहयोगी प्राध्यापक (अर्थशास्त्र) आहेत. युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट, स्टॉर्स येथून त्यांनी अर्थशास्त्रामध्ये पीएच. डी. ही पदवी मिळवली. त्यांचे पदवी (बी.एस्सी.) आणि पदव्युत्तर (एम.एस्सी.) शिक्षण कोलकाता विद्यापीठातून झाले.त्यांना अध्यापन आणि संशोधनाचा 10 वर्षांचा अनुभव आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र, औद्योगिक संघटना, संस्थांचे अर्थशास्त्र आणि डेटा एन्व्हलपमेंट अॅनालिसिस हे त्यांचे संशोधनाचे विषय आहेत. राष्ट्रीय विज्ञान परिषद (एनएसडी) चे निधीसाहाय्य असलेल्या ‘इकॉनॉमिक अॅण्ड सोशल राईट्सः ऑब्स्टॅकल ऑर हँन्डमेडन टू ग्रोथ?’ या प्रकल्पावर त्यांनी काम केले आहे. इंटरनॅशनल कोव्हेनंट फॉर इकॉनॉमिक, सोशल अॅण्ड कल्चरल राईट्स अंतर्गत कोणते देश कुठपर्यंत आर्थिक आणि सामाजिक हक्कसंबंधी कर्तव्यांचे पालन करत आहे हे दर्शवण्यासाठी पर्यायी दृष्टिकोनांची आखणी करणे ही या प्रकल्पातील त्यांची प्रमुख जबाबदारी होती. पीएच.डी. करण्यापूर्वी त्यांनी एसी निल्सन ओआरजी मार्ग, कोलकाता येथे संशोधन सहयोगी म्हणून काम केले. तसेच, ‘डीस्ट्रीक लेव्हल मॉनिटरिंग ऑफ ऑल प्रोग्राम्स ऑफ मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेन्ट’ आणि ‘मुव्हिंग आऊट ऑफ पॉवर्टी: ग्रोथ अॅण्ड डेमोक्रसी’  या प्रकल्पांवर त्यांनी काम केले. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेतला असून अनेक शोधनिबंध सादर केले. आयएमआय, दिल्ली आणि सेज, इंडिया यांच्या इमर्जिंग इकॉनॉमी स्टडीज या नियतकालिकाचे ते सध्या संपादक आहेत. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांना अनेक शिष्यवृत्ती आणि पुरस्कार मिळाले. सन 2007-11 या काळासाठी त्यांना अर्थशास्त्र विभागाची ‘पीएच.डी. पूर्व शिष्यवृत्ती’ आणि सन 2012 मध्ये ग्रॅज्यूएट स्कूलची ‘पीएच.डी. प्रबंध शिष्यवृत्ती’ मिळाली. सन 2011 मध्ये, अमेरिकेतील कनेक्टीकट विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाने त्यांना ‘अब्राहम रीबिकॉफ ग्रॅज्युएट फेलोशिप’ देऊ केली.