Loading...

मिआओ पांग

वरिष्ठ रिसर्च फेलो, इन्स्टिट्यूट ऑफ रुरल इकॉनॉमी अकॅडमी, सिचुआन अकॅडमी ऑफ सोशल सायन्सेस, सिचुआन, चीन.

मिआओ पांग सध्या सिचुआन अकॅडमी ऑफ सोशल सायन्सेस येथील ग्रामीण अर्थव्यवस्था संस्थेमध्ये वरिष्ठ संशोधक आहेत. तत्पूर्वी त्या सिचुआन अॅकॅडमी ऑफ सोशल सायन्सेसच्या रिसर्च मॅनेजमेन्ट डिपार्टमेन्टमध्ये कार्यरत होत्या. वन संसाधन व्यवस्थापन हा त्यांचा अभ्यासाचा प्रमुख विषय आहे. त्या लॉस बानोस येथील फिलीपाईन्स विद्यापीठाच्या विद्यार्थिनी आहेत. बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये त्या अभ्यागत अभ्यासिका म्हणून जात असतात. ग्रामीण समुदाय विकास, ग्रामीण पर्यावरण संरक्षण आणि वन अर्थशास्त्र हे त्यांचे संशोधनाचे विषय होत. त्यांनी दोन पुस्तकांचे सहलेखन केले आहेः मेथोडॉलॉजी युज्ड इन रुरल कम्युनिटी सर्व्हे आणि कम्युनिटी बेस्ड नॅचरल रिसोर्स मॅनेजमेन्ट ही ती पुस्तके होत. सन 2012 मध्ये इकोलॉजिकल व्हल्नरेबल कम्युनिटीज ऍडप्टेशन टू क्लायमेट चेंज इन वेस्टर्न चायना’ या मानव्यशास्त्राच्या राष्ट्रीय प्रकल्पात त्यांचा सहभाग होता. तसेच, सन 2010 मध्ये मानव्यशास्त्रातील चीनचा राष्ट्रीय प्रकल्प इकॉलॉजिकल कम्पेन्सेशन इन पोस्ट एरा ऑफ कन्व्हर्जन फार्मलँड्स इन टू फॉरेस्टलँड्स इन चायना’ यामध्ये देखील त्यांचा सहभाग होता.