Loading...
Nalini

नलिनी नटराजन

पोर्टो रीको विद्यापीठ, यूएसए

नलिनी नटराजन या यू.एस.मधील युनिव्हर्सिटी ऑफ पोर्टो रिकोच्या कॉलेज ऑफ ह्युमॅनिटीजमध्ये इंग्रजी विभागात प्राध्यापक आहेत. तिथे त्या १९८७ पासून अध्यापन करत आहेत. यापूर्वी त्यांनी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, दिल्ली (१९७८–८०) आणि मिरांडा हाउस, दिल्ली (१९८४–८६) येथे अध्यापन केले आणि त्या येल युनिव्हर्सिटीमध्ये (१९८६-८७) पोस्ट-डॉक्टरल फेलो होत्या. त्यांनी १९८४ साली युनिव्हर्सिटी ऑफ ॲबर्डीन, यू.के. येथून पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यांनी विमेन अँड इंडियन मॉडर्निटी: रिडींग्ज ऑफ कॉलनिअल अँड पोस्टकॉलनिअल नॉव्हेल्स हे पुस्तक २००२ मध्ये लिहिले, आणि हँडबुक ऑफ ट्वेंटिएथ सेंच्युरी लिटरेचर्स ऑफ इंडिया याचे संपादन १९९६मध्ये केले. त्याला चॉईस ऑफ ॲकेडेमिक बुक अवॉर्ड मिळाले आहे. त्यांनी इतर अनेक पुस्तकांतून लेख लिहिले आहेत. या पुस्तकाव्यतिरिक्त त्यांनी अलीकडेच टेरानोवा प्रेसद्वारे प्रकाशित झालेले 'द रेजोनेटिंग आयलंड' हे पुस्तक पूर्ण केले. यात कॅरेबियन आणि साऊथ एशिया आंतरसांस्कृतिक लेखांची शृंखला आहे. आपली पार्श्वभूमी आणि वास्तव्य यांच्यामुळे भारत आणि भारतातले अनेक प्रांत, स्थानिक भाषा आणि संस्कृती यांच्याविषयी त्यांना आस्था आहे. तसेच एकोणिसाव्या शतकातील ब्रिटिश घरगुती आणि साम्राज्यवादी संस्कृती, स्रीवादी सिद्धान्त आणि कॅरेबियन व लॅटिन अमेरिकन प्रश्न यांत त्या रस घेतात व या सगळ्याची सांगड घालतात. या अभ्यासक्षेत्रांमधील नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम त्यांनी प्रस्तावित केलेले आहेत. प्रवास, जीवनचरित्रलेखन, पाककला आणि आंतर-सांस्कृतिक संगीत आणि नृत्य यांच्या लोकप्रिय प्रकारांना उत्तेजन देणं यांत त्यांना रुची आहे.