Loading...

सुनेत्रा सेन नारायण

असोसिएट प्रोफेसर, भारतीय जनसंपर्क संस्था, नवी दिल्ली

सुनेत्रा सेन नारायण , पीएच. डी. , - जनसंपर्क, वृत्तपत्रे, लघुपटनिर्मिती, शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात 3० वर्षांचा भरीव अनुभव. डॉ. नारायण यांनी दिल्ली विद्यापीठातून अर्थशास्त्राचे शिक्षण घेतल्यावर त्यांनी दूरसंचार विषयातील मास्टर्स पदवी संपादन केली तसेच जनसंपर्क विषयात अमेरिकेतल्या पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाची "डॉक्टरेट' ही संपादन केली. भारत व अमेरिकेत विद्यादानाचा दीर्घ अनुभव त्यांना आहे. विकास प्रणाली, आंतरराष्ट्रीय संप्रेषण, नव-माध्यमे व भारतीय प्रसार माध्यम क्षेत्र हे त्यांचे प्रावीण्याचे विषय आहेत. नवी दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन मध्ये सध्या त्या सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. "कम्युनिकेटर' या शैक्षणिक नियतकालिकाच्या संपादक म्हणूनही त्यांनी काम केले. तत्पूर्वी वृत्तपत्रांत कार्यरत असताना त्यांनी भारतातील उद्योग जगत व पर्यटन क्षेत्रात भरीव लिखाण केले. ऑक्सफर्ड प्रकाशनाच्या ग्लोबलायझेशन अँड टेलिव्हिजन, अ स्टडी ऑफ द इंडियन एक्सपीरियन्स - 1९९०-2०1० (2०14) ' या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले. जनसंपर्क क्षेत्राशी संबंधित अनेक अभ्यासपूर्ण लेख त्यांनी लिहिले आहेत. Email :sunetran@gmail.com