Loading...

शालिनी नारायणन

निवृत्त प्राध्यापक, इतिहास आणि संरक्षण अभ्यास

शालिनी नारायणन, डी. फील. या वृत्त व जनसंपर्क क्षेत्राच्या सल्लागार म्हणून कार्यरत असून त्यांना शासकीय व बिगर शासकीय क्षेत्रातील कामाचा सुमारे तीन दशकांचा भरीव अनुभव आहे. सनदी अधिकारी म्हणून सुमारे 23 वर्षे काम केल्यावर 2०13 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. शासकीय सेवेत असताना प्रसार भारतीच्या दूरदर्शन व आकाशवाणी या दोन्ही संस्थांमध्ये वृत्तसेवा विभागात दहा वर्षांहून जास्त काळ त्या कार्यरत होत्या. केंद्र सरकारच्या डीएव्हीपी या जाहिरात संस्थेत त्यांनी काम केले. तसेच "एम्प्लॉयमेंट न्यूज' या नोकरीविषयक एकमेव सरकारी नियतकालिकाच्या त्या संपादक होत्या. नवी दिल्लीतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन येथे सहयोगी प्राध्यापक असताना त्या दोन विभागांच्या प्रमुख होत्या. तसेच त्यांनी अनेक संशोधने केली. निवृत्तीनंतर त्यांनी डिजिटल अर्थविषयक संस्था, अमली पदार्थांचा दुरूपयोग, मानसिक आरोग्य या परस्परभिन्न क्षेत्रांतही कार्य सुरू ठेवले आहे. Email:nar.shalini@gmail.com