Loading...

जेफ्फ्री ए. ऑडी

मानद ज्येष्ठ व्याख्याते, सिडनी विद्यापीठातील इतिहास विभागामध्ये, मानद ज्येष्ठ व्याख्याते.

जेफ्फ्री ए. ऑडी हे ऑस्ट्रेलियामधील सिडनी विद्यापीठाच्या इतिहास विभागामध्ये सहयोगी मानद संशोधक आहेत. या विभागामध्ये १९६४ सालापासून ते इतिहासाचे व्याख्याते म्हणून कार्यरत आहेत आणि युनायटेड थिओलॉजिकल कॉलेज, बेंगलोर (२००३) येथे अभ्यागत प्राध्यापक म्हणून अध्यापन करत आहेत.

डॉ. ऑडी यांचे पहिले पुस्तक १९५७ साली प्रसिद्ध झाले. आतापर्यंत त्यांनी दक्षिण आशियातील धर्माच्या विविध पैलूंवर लेखन केले आणि त्यामध्ये त्यांचा भर वसाहतपूर्व आणि वासाहतिक काळातील हिंदुवाद आणि प्रचारकांनी सांगितलेला ख्रिश्चन धर्म यावर आहे. त्यांची ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणेः मिशनरीज, रिबेलीअन अॅण्ड प्रोटो-नॅशनलिझम. जेम्स लाँग ऑफ बेंगाल: १८१४-८७ (१९९८); रिलिजिअस कन्वर्जन मूव्हमेंट्स इन साऊथ एशियाः कंटीन्युईटीज अॅण्ड चेंज (संपादित, १९९७); पॉप्युलर रिलीजन, एलिट्स अॅण्ड रिफॉर्म: हूक स्वीगिंग अॅण्ड इट्स प्रॉहिबीशन इन कॉलोनिअल इंडिया, १८००-१८९४ (१९९५); आणि सोशल प्रोटेस्ट इन इंडियाः ब्रिटिश प्रोटेस्टंट मिशनरीज अॅण्ड सोशल रिफॉर्म्स, १८५०-१९०० (१९७९).