Loading...
Shyamlal

श्यामलाल यादव

वरिष्ठ संपादक आहेत, इंडियन एक्सप्रेस, नवी दिल्ली

श्यामलाल यादव शोध पत्रकारितेसाठी आणि यंत्रणेला प्रश्न विचारण्यासाठी माहिती अधिकाराचा प्रभावीपणे वापर करण्यात अग्रणी राहिले आहेत. भारतातील प्रदूषित नद्यांच्या प्रश्नावर ‘स्ट्रीम्स ऑफ फिल्थ’ (इंडिया टुडे, 30 डिसेंबर 2009) या त्यांच्या बातमीची युनेस्कोने जगभरातील 20 सर्वोत्तम शोध बातम्यांमध्ये निवड केली. इंडियन एक्सप्रेसच्या शोध विभागाचे सदस्य म्हणून, मंत्री आणि सनदी अधिकारी यांच्या परदेश वाऱ्या, मंत्र्यांनी त्यांच्या नातेवाइकांना स्वीय सचिव म्हणून नेमणे, जन धन खात्यातील शून्य बाकी असलेली खाती कमी करण्यासाठी बँक कर्मचाऱ्यांनी स्वतःचे पैसे अशा खात्यांमध्ये भरणे या त्यांनी केलेल्या बातम्यांचा मोठा प्रभाव पडला आणि परिणाम दिसून आला. शोध पत्रकारितेच्या विभागात, रामनाथ गोयनका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दोन वेळा जिंकणारे ते एकमेव आहेत. श्यामलाल यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत, ज्यात ब्रुसेल्स येथील युरोपीय कमिशन फॉर डेव्हलपमेंटचे लोरेंजो नटाली जर्नालिझम अवॉर्ड; एडीबी इन्स्टिट्यूट, टोकियो यांचे डेव्हलपिंग एशिया जर्नालिझम अवॉर्ड; एनडीटीव्ही-पीसीआरएफकडून नॅशनल आरटीआयअवॉर्ड; स्टेट्समन रुरल रिपोर्टिंग अवॉर्ड; माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता विद्यापीठ; चेन्नईचा उत्कृष्ट शोधपत्रकारिता पुरस्कार; आणि पत्रकारितेतील उत्कृष्टतेसाठी गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कार असे पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी माहिती अधिकार कायदा आणि माध्यमे यावर रिओ दी जनेरियो येथे, कोलंबिया युनिवर्सिटी, न्यूयॉर्क; श्रीलंका प्रेस इन्स्टिट्यूट, कोलंबो, पॅराडेनिया विद्यापीठाच्या कँडी आणि मॅनेजमेंट अँड रिसर्च डेव्हलपमेंट इनिशिऐटिव्हच्या ढाका येथे आयोजित तसेच युरोपीय इन्व्हेस्टिगेटीव्ह जर्नालिझम कॉन्फरन्स ब्रुसेल्स; कीव्ह आणि जोहान्सबर्ग येथे ग्लोबल इन्व्हेस्टिगेटीव्ह जर्नालिझम कॉन्फरन्स; एशियन इन्व्हेस्टिगेटीव्ह जर्नालिझम कॉन्फरन्स, काठमांडू, आशियाई शोध पत्रकारिता संमेलन, सिऑल येथे संबोधित केले आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये पॅरिस येथे यूनेस्कोच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्ससाठी आयोजित चर्चासत्रात सहभागी झाले. जनसत्ता, अमर उजाला आणि इंडिया टुडे इथे काम केल्यानंतर श्यामलाल सध्या इंडियन एक्सप्रेसमध्ये वरिष्ठ संपादक आहेत.