Loading...

देबारती हालदर

युनायटेडवर्ल्ड स्कूल ऑफ लॉ, अहमदाबाद, गुजरात

देबारती हालदर या वकील आणि कायदेतज्ज्ञ आहेत. सध्या, त्या गुजरातमध्ये अहमदाबाद येथे युनायटेड वर्ल्ड स्कूल ऑफ लॉ येथे कायदेविषयक अभ्यासाच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत आणि भारतातील सेंटर फॉर सायबर व्हिक्टिम काउन्सिलिंगच्या(सीसीव्हीसी) व्यवस्थापकीय संचालिका (मानद) आहेत (www.cybervictims.org). त्यांनी एलएलबी कलकत्ता विद्यापीठातून केले आणि इंटरनॅशनल अँड कॉन्स्टिट्यूशनल लॉ या विषयात पदव्युत्तर पदवी मद्रास विद्यापीठातून घेतली. नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया विद्यापीठ (एनएएलएसआययू), बेंगलोर, भारत येथून त्यांनी पीएचडी घेतली. सायबर क्राईम अँडद व्हिक्टिमायझेशन ऑफ विमेन: लॉज, राईट्स रेग्युलेशन (आयजीआय ग्लोबल, जुलै 20११) या पुस्तकामध्ये त्यांनी सहलेखकाची भूमिका बजावली आहे. समकक्ष पुनरावलोकित नियतकालिकांमध्ये आणि समकक्ष पुनरावलोकित पुस्तकांमध्ये त्यांचे अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. ब्रिटिश जर्नल ऑफ क्रिमिनॉलॉजी,  ई जर्नल ऑफ लॉ अँड  रिलिजन, व्हिक्टिम्स अँड ऑफेंडर्स; मरडोक युनिव्हर्सिटी ई जर्नल ऑफ लॉ; इरसीईएस ऑनलाईन क्वार्टरली रिव्ह्यू; टीएमसी अॅकॅडमिक जर्नल (सिंगापूर); तेमिदा अँड इंडियन जर्नल ऑफ क्रिमिनॉलॉजी क्रिमिनॅलिस्टिक्स यासह ख्यातनाम जर्नलमध्ये त्यांचे काम प्रसिद्ध झाले आहे; आणि संपादित खंड, क्राईम्स ऑफ द इंटरनेट, ट्रेंड्स अँड इश्यूज ऑफ व्हिक्टिमॉलॉजी, सायबर क्रिमिनॉलजी. ११–१३ जून 20१२ दरम्यान झालेले स्टॉकहोम क्रिमिनॉलॉजी सिम्पोझियम आणि १५–१६ मे 20१५ दरम्यान इस्तंबूल, तुर्कस्तान येथे झालेली सोशल मीडिया फॉर गुड या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेसह अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी आपले संशोधन सादर केले आहे. राष्ट्रीय महिला आयोग, यूनिसेफ, फेसबुक, मुलांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी केरळ राज्य आयोग, राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर यूथ डेव्हलपमेंट, विमेन ख्रिश्चन कॉलेज (कोलकाता आणि चेन्नई), लॉयला कॉलेज, नॉर्थ ईस्टर्न पोलीस अॅकॅडमी, मुलांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आसाम राज्य आयोग आणि मनोनमनियम सुंदरनर विद्यापीठ, तिरुनवेली यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांच्या त्या मार्गदर्शक होत्या. देबारती यांच्या संशोधनातील रुचीमध्ये संवैधानिक कायदा, आंतरराष्ट्रीय कायदा, पीडितांचे हक्क, सायबर गुन्हे आणि कायदे यांचा समावेश आहे. Email: debaratihalder@gmail.com URL: http://www.debaratihalder.org.