Loading...

जयशंकर के.

हे रक्षा शक्ती विद्यापीठ (पोलीस आणि अंतर्गत सुरक्षा विद्यापीठ) अहमदाबाद, गुजरात, भारत येथे गुन्हाशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि प्रमुख आहेत.

के. जयशंकर हे सध्या क्रिमिनॉलॉजीचे प्राध्यापक आणि रक्षा शक्ती विद्यापीठ (पोलीस आणि अंतर्गत सुरक्षाविद्यापीठ), अहमदाबाद,गुजरात येथे क्रिमिनॉलॉजी विभागाचे प्रमुख आहेत. त्याआधी, त्यांनी मनोनमनियम सुंदरनर विद्यापीठ, तिरुनवेली, तमिळनाडू, भारत येथे क्रिमिनॉलॉजी आणि क्रिमिनल जस्टिस विभागामध्ये फॅकल्टी सदस्य म्हणून काम केले आहे. त्यांनी लेख, पुस्तके, पुस्तकांतील प्रकरणे, आणि संपादकीय यांच्यासह शंभराहून अधिक प्रकाशने प्रसिद्ध केली आहेत. प्रतिष्ठित अशा नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्सेस, भारत (एनएएसआय) स्कोपस तरुण शास्त्रज्ञ पुरस्कार २0१२–सामाजिक शास्त्रे आणि अध्यापनातील उत्कृष्टता आणि क्रिमिनॉलॉजीमधील संशोधन याकरिता ISC–एस. एस. श्रीवास्तव पुरस्कार यांनी ते सन्मानित आहेत. ते सेंटर फॉर क्रिमिनल जस्टिस स्टडीज, स्कूल ऑफ लॉ, युनिव्हर्सिटी ऑफ लीड्स, यूके येथे कॉमनवेल्थ फेलो (200९–2010) होते आणि त्यांनी सायबर गुन्ह्यांमधील पीडित यांवरील संशोधन प्रकल्प पूर्ण केला आहे. इंटरनॅशनल जर्नल ऑफ सायबर क्रिमिनॉलॉजी (www.cybercrimejournal.com) चे ते संस्थापक मुख्य संपादक आहेत आणि इंटरनॅशनल जर्नल ऑफ क्रिमिनल जस्टिस सायन्सेस (www.ijcjs.com) चे ते मुख्य संपादक आहेत. साउथ एशियन सोसायटी ऑफ क्रिमिनॉलॉजी अँड व्हिक्टिमॉलॉजी (एसएएससीव्ही) चे ते संस्थापक अध्यक्ष आणि सेंटर फॉर सायबर व्हिक्टिम काउन्सिलिंग (सीसीव्हीसी) (www.cybervictims.org) चे संस्थापक कार्यकारी संचालक (ऑनररी) आहेत. UNODC (युनायटेड नेशन्स ऑफिस ऑफ ड्रग्ज अँड क्राइम), आयडेंटिटी संबंधित गुन्ह्यांवरील (२00७–0८) मुख्य गट याचे ते सदस्य होते. मेंबरशिप अँड अॅडव्हान्समेंट कमिटी, वर्ल्ड सोसायटी ऑफ व्हिक्टिमॉलॉजी (WSV); इंटरनॅशल अॅडवायजरी बोर्ड फॉर द सेंटर फॉर द रीसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ पॉझिटिव्ह क्रिमिनॉलॉजी, क्रिमिनॉलॉजी विभाग, बार इलान विद्यापीठ, इस्रायल; अॅडवायजरी बोर्ड फॉर द सेंटर फॉर सायबर क्राइम स्टडीज, जोन जे कॉलेज ऑफ क्रिमिनल जस्टिस, न्यूयॉर्क, यूएसए; द इंटरनॅशनल सायबर क्राइम रीसर्च सेंटर, सायमन फ्रेजर युनिव्हर्सिटी, व्हॅनकूव्हर, कॅनडा; आणि द सायंटिफिक कमिशनल ऑफ इंटरनॅशनल सोसायटी ऑफ क्रिमिनॉलॉजी (आयएससी) चे ते सदस्य आहेत. पर्थ, ऑस्ट्रेलिया येथे जुलै 20१५ मध्ये झालेल्या १५व्या वर्ल्ड सोसायटी ऑफ व्हिक्टिमॉलॉजी सिम्पोजियम येथे, आणि द हेग, नेदरलँड येथे मे 20१२ मध्ये झालेल्या १४ व्या वर्ल्ड सोसायटी ऑफ व्हिक्टिमॉलॉजी सिम्पोजियम येथे ते मुख्य वक्ते होते. ब्रिटिश सोसायटी ऑफ क्रिमिनॉलॉजी (BSC) चे आंतरराष्ट्रीय राजदूत म्हणून त्यांची नुकतीच नेमणूक झाली होती. ते अॅकॅडमिक डिसिप्लीन, सायबर क्रिमिनॉलॉजी (200७) चे संस्थापक आहेत आणि स्पेस ट्रान्झिशन थिअरी ऑफ सायबर क्राईम्स(200८) चे पुरस्कर्तेआहेत. त्यांची शैक्षणिक क्षमतेची क्षेत्रे व्हिक्टिमॉलॉजी, सायबर क्रिमिनॉलॉजी, क्राइम मॅपिंग, जीआयएस, जातीय हिंसा, पोलिसिंग आणि क्राइम प्रीव्हेंशन ही आहेत. Email: drjaishankar@gmail.com URL: http://www.jaishankar.org