Loading...
Ziya Us

ज़ियाउस्सलाम

सहयोगी संपादक, फ्रंटलाइन

ज़ियाउस्सलाम हे प्रथितयश वाङ्मयीन आणि सामाजिक समीक्षक आहेत. सलाम द हिंदू या वृत्तपत्राशी गेले १८ वर्षे संलग्न आहेत आणि ते गेली १६ वर्षे द हिंदूच्या उत्तर भारतीय आवृत्तींसाठी फीचर्स एडिटर म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते फ्रंटलाईन या पाक्षिकाचे सहयोगी संपादक असून या नियतकालिकासाठी पुस्तक परीक्षणे आणि सामाजिक सांस्कृतिक प्रश्नांवर लेखन करतात. सलाम यांचे लिंच फाईल्स: द फरगॉटन सागा ऑफ व्हिक्टी म्स ऑफ हेट क्राईम्स हे सेज पब्लिकेशनचे पुस्तक २०१९मध्ये नुकतेच प्रकाशित झाले. टिल तलाक डू अस पार्ट या २०१८ च्या सुरुवातीस प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये लेखकाने इस्लाममधील तलाकच्या विविध विकल्पांविषयी अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. त्यांचे दिल्ली ४ शोज हे पुस्तक २०१६ साली प्रकाशित झाले. यामध्ये बोलपटापासून चित्रपटांचा प्रवास रेखाटला आहे. सलाम यांनी बीईंग यंग इन द वर्ल्ड ऑफ इस्लाम आणि पास्ट टेन्स: लिव्हिंग ऑन दि एज या साहित्यसंग्रहांमध्ये लेखन केले आहे. याशिवाय हाउस फुल: दि गोल्डन एज ऑफ हिंदी सि नेमा हा गद्यसंग्रह संपादित केला आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाचे (Non Feature Film, २०११), चित्रपटांवरील सर्वोत्तम लेखन (२००८) आणि वातावरण अशा कार्यक्रमांचे परीक्षकपद भूषविले.