Loading...

प्रीती दिलीप पोहेकर

राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे लोकप्रशासन विषयाच्या सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख आहेत

प्रीती दिलीप पोहेकर, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथे लोकप्रशासन विषयाच्या सहयोगी प्राध्यापक व विभागप्रमुख आहेत. त्यांना अध्यापनाचा १८ वर्षांचा अनुभव आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून प्राप्त झालेल्या आपत्ती प्रशासन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची समन्वयक म्हणून काम करीत आहेत. त्यांनी ८ आंतरराष्ट्रीय (कॅलिफोर्निया, हाँगकाँग, बँकॉक इत्यादी) राष्ट्रीय १२, राज्यस्तरीय १२ शोधनिबंधांचे वाचन केलेले आहे, ५ राष्ट्रीय आणि ७ राज्य परिषदांमध्ये साधनव्यक्ती म्हणून व्याख्यान दिलेले आहे. त्यांच्या २ आंतरराष्ट्रीय स्तरावरील शोधनिबंधांना उत्कृष्ट निबंध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यांचे मराठी भाषेतील ८, इंगजी भाषेतील १ पुस्तक प्रकाशित झालेले आहे. संपादित ३ पुस्तकांमध्ये प्रकरणे लिहिलेली आहेत. त्यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण महराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांचे एम.ए. लोकप्रशासन विषयाच्या पुस्तकांचे संपादन केलेले आहे. त्यांचे ३ संशोधन प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, एका प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ७ विद्यार्थ्यांनी एम.फिल. आणि ७ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. पदवी संशोधन पूर्ण केलेले आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय मुखापत्रांमध्ये ११ शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत आणि वृत्तपत्र, नियतकालिकांमध्ये ५० पेक्षा अधिक लेख प्रकाशित झालेले आहेत. त्यांना स्वामी रामनंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या (२०१२-२०१६) लोकप्रशासन अभ्यास मंडळ सदस्य म्हणून काम केलेले आहे, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूरच्या (स्वायत्त)  लोकप्रशासन अभ्यास मंडळ अध्यक्ष, (२०१३ पासून), संगीत अभ्यास मंडळ सदस्य, (२०१३ पासून), एनसीसी स्टडीस अभ्यास मंडळ सदस्य (२०१६-२०१८), समाजशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य, (२०१९ पासून), वृत्तपत्रविद्या व जनसंवाद अभ्यास मंडळ सदस्य, (२०१९ पासून) कार्याचा अनुभव आहे. त्यांनी औरंगाबाद आकाशवाणी केंद्र येथे प्रासंगिक निवेदिका (१९९२-२००४), वृत्त भाषांतरकार व निवेदिका (२००४-०७) म्हणून काम केलेले आहे. त्या अनेक राष्ट्रीय, राज्य, स्थानिक कार्यक्रमांमध्ये निवेदन, सूत्रसंचालन करतात. त्या क्षमता बांधणी, कौशल्य बांधणी व तणाव व्यवस्थापन, मृदू कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करतात.