Loading...
Image
Image
View Back Cover

दि विनिंग मॅनेजर

व्यावसायिक यशाची शाश्वत तत्त्वे, 2e

 • वॉल्टर व्हिएरा - माजी अध्यक्ष, इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ मॅनेजमेंट कन्सल्टिंग इन्स्टिट्युट्स (आयसीएमसीआय)

व्यवस्थापन क्षेत्रात नोकरी करून स्वतःच्या पायांवर स्थिरावण्याची मनिषा बाळगणाऱ्यांना वॉल्टर व्हिएरा यांचे ‘दि विनिंग मॅनेजर’ हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरू शकेल. एक चांगला/चांगली मॅनेजर बनण्यासाठी कोणती मूल्ये आत्मसात करावी लागतात, कोणत्या बाबी शिकून घ्याव्या लागतात, कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो, कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात आणि त्यांचा फायदा घ्यायचा असतो, याविषयीचे समग्र आणि रोचक आकलन आपल्याला या पुस्तकातून नक्कीच होऊ शकते. व्यवस्थापनामध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर वॉल्टरना तुमचा मार्गदर्शक बनवा असे विख्यात मॅनेजमेंट गुरू फिलिप कोटलर यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलंय. ते योग्यच आहे.

व्यवस्थापन शास्त्राच्या निव्वळ सिद्धान्तापलीकडे जाऊन हे पुस्तक कॉर्पोरेट जगतातील प्रत्यक्ष घडामोडींचा, स्थितींचा धांडोळा घेते. नोकरीसाठी अर्ज करण्यापासून ते मध्यम-स्तर व्यवस्थापनापर्यंतचा काळ यात अंतर्भूत आहे. वॉल्टर व्हिएरा यांचा ५० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव चटपटीत आणि सोप्या भाषेत आपल्यासमोर येतो आणि सिद्धान्तापलीकडे जाऊन ‘काय करायला हवे’ याविषयी सुयोग्य मार्गदर्शन करतो.

 • के व्ही कामत यांची प्रस्तावना
 • प्रास्ताविक

भाग एक: प्रारंभ करताना

 • उंबरठ्यावरील पहिले पाऊल: आयुष्यातील काम करण्याच्या टप्प्याची सुरुवात
 • भव्य कारकीर्दीचा आराखडा आखताना: प्रगतीचे टप्पे कसे निश्चित करावे
 • कोणत्या अर्जांना यश येते आणि कोणत्या अर्जांना यश येत नाही
 • मुलाखतीला सामोरे जाताना: हमखास राहून जाणाऱ्या मुलभूत गोष्टी
 • मुलाखत देण्याची कला: मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीचे मन कसे वाचावे?
 • मुलाखतीनंतरचा पाठपुरावा: आपली बाजू किती रेटावी?
 • नियोक्त्याची निवड:झेप घेण्याआधी मागे पुढे पहा
 • तणावाचा सामना: एक मोठे आव्हान
 • मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला समजून घेताना: मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा प्रभाव
 • नोकरीतील पहिला बदल: एक मोठे आव्हान
 • पदनाम स्वीकारताना सावधान: पदनामे फसवी असू शकतात
 • दीर्घकालीन फायदे ओळखणे: क्षितीजाच्या पलीकडे पहा

भाग दोन: गुण आणि कौशल्यांची जोपासना

 • वरिष्ठांशी जुळवून घेणे: एक कायमचे आव्हान
 • यशस्वी होण्यात गुरूची मदत: गुरूच्या सहाय्याने प्रगतीचा मार्ग सुकर करा
 • अनपेक्षित बाबींमुळे न डगमगणे: अनपेक्षित आव्हानात संधी लपलेली असू शकते
 • लहानसहान बाबिंमधून शिकण्याचे धडे: छोट्या गोष्टीतून माणसे ओळखता येतात
 • उपयुक्त साहचर्य: समन्वयाच्या शक्तीचा पुरेपूर वापर
 • जनसंपर्कातून व्यावसायिक प्रगती: जनसंपर्क वाढ
 • संधीचा फायदा घेणे: समज आणि कुवतीची गरज
 • संघभावनेचे महत्व: समुदायाच्या ताकदीचा कौशल्यपूर्ण वापर
 • केवळ कार्यक्षम व्यवस्थापक बनण्यापेक्षा प्रभावी व्यवस्थापक कसे बनावे?
 • शिकण्याच्या संधी अनेक वेळा आणि अनेक प्रकारे मिळतात
 • शिकणे, शिकलेल्या गोष्टींचा त्याग करणे आणि पुन्हा शिकणे: यशाचे गमक
 • वेळेचे नियोजन: यशाची गुरुकिल्ली
 • प्रभावी संवाद: फायोलने विषद केलेल्या चक्राकार व्यवस्थापन प्रक्रियेचा महत्वाचा आरा
 • टिपणे काढणे: स्मरणशक्तीला अचूकतेची जोड
 • संवादाला अवरोध: मी सर्व आधीच जाणतो
 • वस्तुस्थिती मांडताना चतुरतेचा अभाव: सत्य कथन पण चुकीच्या पद्धतीने
 • व्यक्ती आणि मुद्दे वेगळे ठेवणे: पारखी वृत्ती बाणवा
 • निर्णय घेण्यात टाळाटाळ: अनेक जणांमधील महत्वाची उणीव
 • लोकांना कसे प्रेरित करावे: प्रेरणा कशी कायम ठेवावी
 • कल्पकतेची गरज: शोधकता हीच यशाची गुरुकिल्ली
 • बदल्यातून शिकण्याचे धडे: भ्रमंती ही शिकण्याची संधी
 • चिकाटीचे फळ: दूरदृष्टीची गरज

भाग तीन: वृत्ती आणि मुल्ये

 • व्यावसायिक शिष्ठाचार कालबाह्य आहेत?: सहज संवादातील शिष्ठाचारांचे महत्व
 • बेसावधपणाचा फटका इतरांना बसू शकतो: वाईट व्यवस्थापकच बेसावध असतो
 • बेसावधपणाचा स्वतःलाही भोवतो: स्वतःच्या पायावर धोंडा
 • विश्वासार्हतेचे महत्व: नेत्याचे अनुयायी हवेच
 • शब्द पाळण्याचे महत्व: स्वतःशी प्रामाणिक रहा
 • विश्वासार्हता वाढवा: ख्याती मिळवा
 • विश्वासार्हता मिळवणे आणि गमावणे: विश्वासार्हता आणि बेभरवसा
 • सहकाऱ्यांचा दबाव: अत्यंत महत्वाचा घटक
 • सचोटीच्या मर्यादा: संतुलन पाळण्याचे आव्हान
 • भ्रष्टाचार: विषवल्लीकडे लक्ष द्या, फुलांनी मोहित होऊ नका
 • भेटवस्तूंची देवाणघेवाण: उभयपक्षी सोयीच्या पद्धती
 • इतरांकडून अपेक्षा: आभार मानणे निरुपयोगी असते?
 • एकांताची ओढ: एकटे राहायला शिका पण एकटे पडू नका
 • बरे आहात ना?: तुमच्या उत्तराने लोकांना सहानुभूती किंवा असूया वाटू शकते
 • सहकाऱ्यांची फसवणूक: काहीजणांची काहीवेळा फायद्याची
 • नशिबाचा खेळ: कधीकधी नशिबाने भाग्य उजळते
 • मुल्ये आणि कार्यकारी अधिकारी: काही गोष्टी बदलत्या जगातही शाश्वत असतात
 • व्यवसायात रहाण्याची पात्रता: योग्य प्रवृत्ती आणि जोपासना यांचा फायदा
 • चारित्र्य आणि स्वयंशिस्त: नेत्यांचे मुलभूत गुण
 • छत्रछाया: अनेकांना दुसऱ्याचा हेवा वाटतो
 • लेखकाचा अल्पपरिचय
वॉल्टर व्हिएरा

वॉल्टर व्हिएरा हे सन १९७५मध्ये स्थापन झालेल्या मार्केटिंग अॅडव्हायझरी सर्व्हिसेस ग्रुपचे अध्यक्ष आहेत. त्यापूर्वी त्यांनी १४ वर्षे एवढा प्रदीर्घ काळ वेगवेगळ्या प्रतिथयश कंपन्यांमध्ये नोकरी केली. या कंपन्यांमध्ये ग्लॅक्सो, वार्नर लँबर्ट आणि बूट्स यांचा समावेश होतो. ते प्रमाणित व्यवस्थापन सल्लागार तर आहेतच पण इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कन्सल्टंटस ऑफ इ ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in