Loading...
Image
Image
View Back Cover

आंतरराष्ट्रीय राजकारण

संकल्पना, सिद्धान्त आणि समस्या

Edited by:

 • रुमकी बसू - प्राध्यापिका, राज्यशास्त्र विभाग, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, नवी दिल्ली

‘आंतरराष्ट्रीय राजकारण’ हे रुमकी बसू संपादित पाठ्यपुस्तक म्हणजे जागतिक राजकारणाकडे पाहण्याचा एक नवीन, उत्साहवर्धक प्रयोगच ठरेल. आंतरराष्ट्रीय संबंध आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या दोन्ही संज्ञा दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात अधिकाधिक विकसित होऊ लागल्या. अन्य राष्ट्रांच्या राजकीय हितसंबंधांना सामावून घेण्यासाठी आपल्या राजकीय हितसंबंधांमध्ये योग्य तो बदल घडवून आणण्याच्या सातत्याने चालणाऱ्या प्रक्रियांचा हा अभ्यास आहे.

रुमकी बसू आणि त्यांच्या सहलेखकांनी या विषयाचे विविध पैलू उलगडून विद्यार्थ्यांसमोर आणले आहेत.आंतरराष्ट्रीय संबंध आणि राजनय या ठरावीक विषयांपलीकडे जाऊन दहशतवाद, जागतिक पर्यावरण अशा ताज्या विषयांचा ऊहापोहदेखील यात आढळतो.

भारतीय विद्यापीठांमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी या पुस्तकाची खास रचना करण्यात आली आहे.

सध्याच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील मुख्य संकल्पना, सिद्धान्त आणि मुद्दे यांची जाण विद्यार्थ्यांमध्ये भिनवण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल.

विविध मान्यवर लेखकांनी योगदान दिलेले हे खंडात्मक पुस्तक वाचल्यानंतर या विषयाकडे पाहण्याचा आणि तो मांडण्याचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलेल यात शंका नाही.

विभाग अ: संकल्पना

 • राष्ट्र-राज्य व्यवस्थाः राष्ट्रीय सामर्थ्य, सत्तासंतुलन आणि सामूहिक सुरक्षितता एस. आर. टी. पी. सुगुणुकारा राजू
 • राष्ट्रीय हितसंबंधांची भूमिका फराह नाझ
 • राजनयः स्वरूप, प्रकार आणि महत्त्व मेहताब मन्झर
 • वसाहतवाद आणि नववसाहतवादः निर्वसाहतीकरणाचे परिणाम फुरकन अहमद
 • निःशस्त्रीकरण, शस्त्रनियंत्रण आणि अण्वस्त्र प्रसार एम. मुस्लिम खान

विभाग आ: सिद्धान्त

 • उदारमतवाद फराह नाझ
 • वास्तववाद रुमकी बसू
 • मार्क्सवाद कृष्ण स्वामी दारा
 • स्त्रीवाद कृष्ण स्वामी दारा
 • आंतरराष्ट्रीय संबंधांमधील उत्तर आधुनिकतावाद आणि रचनात्मकतावाद कृष्ण स्वामी दारा

विभाग इ: समस्या

 • जागतिकीकरणः अर्थ आणि आयाम अदनान फारुकी
 • संयुक्त राष्ट्रेः बदलती भूमिका रुमकी बसू
 • मानवी हक्क आणि आंतरराष्ट्रीय राजकारण मेहताब मन्झर
 • जागतिक प्रकरणः समस्या आणि वाद रुमकी बसू
 • दहशतवाद अदनान फारुकी
 • विकास आणि सुरक्षितताः बदलत्या रूपरेषा रुमकी बसू

भाग ई: भारताचे परराष्ट्र धोरण आणि द्विपक्षीय संबंध

 • भारताचे परराष्ट्र धोरण आणि द्विपक्षीय संबंध यांचे मूलभूत निर्धारक घटक मोहम्मद बदरूल आलम
रुमकी बसू

रुमकी बसू या सध्या नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात राज्यशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. सार्वजनिक धोरण आणि शासन, आंतरराष्ट्रीय संघटना, भारतातील विकासाचे राजकीय अर्थशास्त्र अशा विषयांवर त्यांची ८ पुस्तके आणि ३० लेख प्रकाशित झाले आहेत. आशिया प्रशांत क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कार्यशाळांमधील सहभागाव्यतिरिक्त त्यांनी बर्लिन (११९९४), सो ... अधिक वाचा

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in