Loading...
Image
Image
View Back Cover

भारतातील बौद्धधम्म

ब्राह्मणीधर्म व जातीयतेला आव्हान

 • गेल ओमवेट - डॉ बी आर अम्बेडकर सामाजिक बदल आणि विकास विभाग, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, नवी दिल्ली

‘भारतातील बौद्धधम्म’ या पुस्तकाची मांडणी जाणकार आणि सर्वसामान्य वाचक अशा दोहोंना आवडेल, अशा पद्धतीने करण्यात आली आहे. भारतातील बौद्धधम्म, ब्राह्मणवाद आणि जातियतेच्या २५०० वर्षांच्या प्रवासाचा रंजक शोध हे पुस्तक घेते. डॉ. गेल ऑम्वेट बौद्धधम्माचा ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय आणि तात्त्विक अंगांनी धांडोळा समर्थपणे घेतात. भारतात कोठेही खोदकाम केले, तरी बौद्ध संस्कृतीचे अवशेष सापडतातच, इतकी ही संस्कृती आणि बौद्धधम्म या मातीत रुजलेले आहेत. या संस्कृतीचा प्रामुख्याने वैदिक ब्राह्मणवादाशी झालेला संघर्ष हा अनेक अभ्यासकांच्या संसोधनाचा विषय राहिला. या संशोधन परंपरेत या पुस्तकाने मोलाची भरच घातलेली दिसते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बौद्ध धम्माविषयीचे आकलन हा या पुस्तकाचा आरंभबिंदू आहे.

जातिव्यवस्थेचा उगम आणि विकासाची नवीन मीमांसा या पुस्तकात आढळते. हिंदुत्ववादी वर्चस्ववादाला हे पुस्तक काही धीट प्रश्न विचारते. बौद्ध धम्मातील तत्त्वांना बाबासाहेबांनी दिलेली शाश्वत आणि सर्वसमावेशक उत्थानाची जोड सर्वसामान्य वाचक, दलित चळवळी, राज्यशास्त्राचे अभ्यासक, विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचवण्यात हे पुस्तक नक्कीच यशस्वी ठरते.

 • प्रास्ताविक
 • प्रास्ताविकः जग नव्याने घडवताना
 • बौद्धधम्माची पार्श्वभूमी
 • धम्मः बुद्धाच्या शिकवणुकीची मूलभूत तत्त्वे
 • अनित्यता आणि बदल
 • बौद्ध संस्कृती
 • बौद्धधम्माचा भारतातील पराभव
 • बौद्ध पर्वानंतरः भक्ती चळवळी
 • वसातहतकालीन आव्हाने, भारतीय प्रतिक्रिया आणि बौद्धधम्माचे पुनरुज्जीवन
 • नवयान बौद्धधम्म व आधुनिक युग
 • उपसंहार
गेल ओमवेट

Biography not available.

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in