Loading...
Image
Image
View Back Cover

भारतीय माध्यम व्यवसाय , 4e

मुद्रित, टीव्ही, चित्रपट, संगीत, रेडिओ, डिजिटल, आउट ऑफ होम आणि इव्हेंट्स अशा आठ माध्यम घटकांचे सविस्तर विश्लेषण वनिता कोहली-खांडेकर लिखित ‘भारतीय माध्यम व्यवसाय’ या पुस्तकात आढळून येते.

भारतीय माध्यम उद्योगाचा इतिहास, सध्याची गुंतागुंत, नियमन, आर्थिक बाबी, तंत्रज्ञान, मूल्यांकन, केस स्टडीज, कल (भारतीय आणि आंतरराष्ट्रीय) आणि या उद्योगाच्या चलनाविषयीचे नेमके आकलन अशा विविध पैलूंची माहिती हे पुस्तक वाचून मिळते. डिजिटल माध्यमांसंबंधींचे प्रकरण हे चौथ्या आवृत्तीचे वैशिष्ट्य ठरते. डिजिटल माध्यमांकडे चिकित्सक नजरेतून पाहणारे हे पहिलेच सविस्तर लिखाण ठरू शकते. माध्यम नियमनाविषयीदेखील सविस्तर चर्चा आहे. कॉपीराइट कायदा, अब्रुनुकसानी, सोशल मीडिया अशा विविध पैलूंचा आढावा आहे. हा व्यवसाय नेमका कसा चालतो याचे एक चित्रच वाचकांसमोर हे पुस्तक वाचल्यानंतर उभे राहते. पत्रकार, माध्यम वसायिक, विद्यार्थी आणि ज्यांना माध्यमांमध्ये गुंतवणूक करायची आहे, अशा सर्वांनी वाचलेच पाहिजे असे पुस्तक!

 • प्रास्ताविक
 • विशेष क्रेडिट्स
 • भारतीय माध्यमांचे भवितव्य
 • मुद्रित माध्यम
 • टेलिव्हिजन
 • चित्रपट
 • संगीत
 • रेडिओ
 • डिजिटल
 • आउट-ऑफ-होम
 • इव्हेंट्स
वनिता कोहली-खांडेकर

वनिता कोहली-खांडेकर या माध्यमतज्ज्ञ आणि लेखिका आहेत. गेल्या दशकभराहून अधिक काळ त्या भारतीय माध्यम उद्योग आणि मनोरंजन विश्वाचा अभ्यास करत आहेत. त्या बिझनेस स्टँडर्ड आणि मिडडे या दैनिकांसाठी स्तंभलेखन करतात. बिझनेसवर्ल्ड आणि अर्न्स्ट अँड यंगसाठीही त्यांनी काम केले आहे. त्या केंब्रिज विद्यापीठाच्या फेलो (२०००) आहेत आणि भारतातील आघाडीच्या संज्ञापन संस् ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in