Loading...
Image
Image
View Back Cover

भारतातील दलित समाज

सामूहिक विधिलिखिताच्या शोधात

 • सुखदेव थोरात - भारतीय सामाजिक शास्त्र संशोधन परिषद (आयसीएसएसआर); प्राध्यापक, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ

‘भारतातील दलित समाज’ हे सुखदेव थोरात लिखित पुस्तक भारतातील दलितांची सद्यस्थिती मांडण्याबरोबरच त्यांच्या परिस्थितीतील बदलांचा आढावा घेते आणि त्यांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजनाही सुचवते. दलितांचे सध्याचे देशातील स्थान आणि राज्यागणिक स्थान यांचा सविस्तर आढावा हे पुस्तक घेते. यासाठी मानवी विकास, सामाजिक आणि आर्थिक अशा विविध निर्देशांकांचा आधार घेते. मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यासाठी दलितांबरोबर कशा प्रकारे भेदभाव केला जातो याचाही सप्रमाण आणि सोदाहरण विवेचन या पुस्तकात मांडण्यात आले आहे.

अशा प्रकारे दलितांचा सर्वांगीण अभ्यास देशात कदाचित पहिल्यांदाच झाला असेल. सामाजिक, सांस्कृतिक उत्थानाबरोबरच आर्थिक प्रगतीही महत्त्वाची असते आणि त्यातूनच राजकीय उत्कर्ष संभवतो हा संदेश या पुस्तकातून मिळत राहतो. संशोधक, विद्यार्थी, राजकारणी, समाजसेवक, गरिबी आणि सामाजिक दुर्लक्ष या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक अशा सर्वांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरू शकते.

 • प्रास्ताविक
 • विषयप्रवेश
 • भेदभावाविरुद्ध आणि सक्षमीकरणाकरिता शासकीय धोरण
 • लोकसंख्याशास्त्रीय रूपरेखा
 • व्यावसायिक रचनाबंध
 • जमीनधारणा
 • ग्रामीण रोजंदारी कामगार
 • रोजगार व बेरोजगारी
 • आरक्षणाखालील रोजगार
 • ग्रामीण दारिद्र्यः व्याप्ती आणि बदल
 • साक्षरता व शैक्षणिक स्तर
 • आरोग्यविषयक वस्तुस्थिती व आरोग्यसेवांचा वापर
 • नागरी सुविधांची सोयः गृह, पाणी व वीज
 • अस्पृश्यतेची प्रथा आणि अत्याचार
 • निष्कर्ष आणि धोरणात्मक दिशा
सुखदेव थोरात

सुखदेव थोरात हे भारतीय सामाजिक शास्त्र संशोधन परिषदेचे (आयसीएसएसआर) अध्यक्ष; विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) माजी अध्यक्ष; आणि नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत. याशिवाय इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ दलित स्टडीजचे माजी संचालक, आयोवा स्टेट विद्यापीठाचे अभ्यागत विषयतज्ज्ञ आणि वॉशिंग्टनमधील इंटरनॅशनल फुड पॉलिसी रिसर ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in