Loading...
Image
Image
View Back Cover

बोस बंधू आणि भारतीय स्वातंत्र्य

मर्मबंधातल्या आठवणी

‘बोस बंधू आणि भारतीय स्वातंत्र्य’ हे माधुरी बोस लिखित पुस्तक शरदचंद्र आणि सुभाषचंद्र या तेजस्वी बंधूंच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाविषयीच्या आकलनात मोलाची भर घालते. भारतातील तसेच भारताबाहेरील अभ्यासकांसाठी सुभाषचंद्र बोस यांचे आकर्षण चिरंतन आहे. त्यांचे थोरले बंधू शरदचंद्र हेही स्वातंत्र्यसेनानी. बोस बंधूंच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील भूमिकांचा हा धांडोळा पुस्तकरूपातून आपल्यासमोर येतो बोस कुटुंबातीलच अमियनाथ यांच्या प्रत्यक्षदर्शी कथनातून. अमियनाथ हे शरदचंद्रांचे चिरंजीव आणि सुभाषचंद्रांचे पुतणे. पण त्यापलीकडे ते या दोघांचे राजकीय समर्थक आणि विश्वासू दूतही होते. या पुस्तकाच्या निमित्ताने भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील गुंतागुंत आणि चळवळीतील प्रमुख व्यक्तींचे भिन्न दृष्टिकोन यांचेही स्मरण होते. माधुरी बोस याही बोस कुटुंबातल्याच. त्यांचे वडील अमियनाथ यांच्याशी वर्षानुवर्षे केलेल्या चर्चेतून त्यांचा स्वतःचा असा दृष्टिकोन आकारास आला. तो या पुस्तकाला निव्वळ नातेसंबंधांपलीकडे नेऊन एक वैचारिक उंची प्राप्त करून देतो आणि बोस बंधूंना खऱ्या अर्थाने न्याय देतो.

  • प्रस्तावना
  • ऋणनिर्देश
  • परिचय
  • बोस बंधू आणि ‘अमि ’
  • मंडालेची वाट
  • स्वराज्याची साद, स्वराज्याला नकार
  • बोस बंधू आणि गांधी: विभक्त वाटा
  • फाळणीचे कडू औषध
  • स्वतंत्र आणि अखंड बंगाल
  • उपसंहार
माधुरी बोस

माधुरी बोस या कलकत्त्यामध्ये जन्मल्या व वाढल्या. त्या अमियनाथ आणि ज्योत्स्ना बोस यांचे द्वितीय अपत्य, शरदचंद्र बोस यांची नात आणि त्यांचे कनिष्ठ बंधू असलेल्या सुभाषचंद्र बोस यांच्या नातपुतणी आहेत. भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या प्रतिष्ठित बोसबंधुंविषयी आपले वडील अमिय यांनी सांगितलेल्या आठवणी या माधुरी यांचा बालपणीचा ठेवा ह ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in