Loading...
Image
Image
View Back Cover

ऑपरेशन ब्लॅक थंडर

पंजाबमधील दहशतवादाचा प्रत्यक्षदर्शी लेखाजोखा

पंजाबमधील सुप्रसिद्ध ‘ऑपरेशन ब्लॅक थंडर’ ही कारवाई सुरू करण्यात आणि राबवण्यात, अमृतसरचे तत्कालीन उपायुक्त सरब जित सिंग यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्याच लेखणीतून या कारवाईचा थरारक लेखाजोखा या पुस्तकाच्या रूपात वाचकांसमोर येतो. निव्वळ कारवाई वृत्तांकनाच्या पलीकडे जाऊन हे पुस्तक पंजाबमधील दहशतवादाचा उदय आणि फैलाव, यानिमित्ताने एकूणच भारतातील दहशतवादाला खतपाणी घालण्याची पाकिस्तानची नीती अशा अनेक घटकांचे सखोल विश्लेषण करते. या संपूर्ण स्फोटक कालखंडातील राजकारण्यांच्या आणि प्रामुख्याने काँग्रेसच्या सदोष भूमिकेवर टीका करताना सरब जित कशाचीच पत्रास बाळगत नाहीत. अकाली दलासारख्या प्रादेशिक पक्षावर अंकुश ठेवण्याच्या नादात, गुप्तचर संस्थांच्या माध्यमातून जर्नैलसिंग भिंद्रनवालेसारख्या घातक विभाजनवाद्याला उत्तेजन देण्याच्या भूमिकेची सडेतोड चिरफाड सरब जित करतात.

ऑपरेशन ब्लू स्टारमुळे पंजाबमधील दहशतवाद ऊग्र बनला. पण ऑपरेशन ब्लॅक थंडरमुळे या दहशतवादाला पायबंद बसला आणि इतिहासाने वेगळे वळण घेतले. या काळातील अनेक गूढ व्यक्तींना, घटनांना सरब जित प्रकाशात आणतात.

 • सुरुवातीचे चार शब्द
 • सुवर्ण मंदिर: वादळाचा केंद्रबिंदू
 • शीख वारसा आणि पंजाब प्रश्न
 • राजीव-लोंगोवाल करार: एक ‘गुप्त’ फुंकर
 • एस एस बर्नाला सरकार: जखमेवरली फुंकर अडली
 • राज्यपाल राय यांची राजवट
 • धर्म आणि राजकारण
 • जानेवारी–मार्च १९८८: वाढता हिंसाचार
 • एप्रिल–मे १९८८: हत्या थांबवण्याचे उपाय
 • ऑपरेशन ब्लॅक थंडर
 • दहशतवाद्यांची शरणागती
 • मध्यरात्रीचा खटला
 • मर्यादेची पुनर्स्थापना
 • लढाई शस्त्रांची की धैर्याची
 • एसजीपीसीची दुविधा
 • जसबीर सिंग रोडेची बडतर्फी
 • कॉरिडॉर योजना
 • जसबीर सिंग रोडेचे पुनरुत्थान
 • प्रलंबित पंचायत निवडणुका: गमावलेल्या संधी
 • दोन दहशती: दहशतवादी आणि पोलीस
 • राष्ट्रीय क्रीडास्पर्धा
 • केंद्रातील नवीन सरकार
 • राज्यपाल मुखर्जींच्या प्रशासनाचा ‘नागरी चेहरा’
 • राज्यपाल वर्मांचा कार्यकाल
 • १९९०: हिंसा पुढे चालू
 • राज्यपाल मल्होत्रा पदभार स्वीकारतात
 • लोकशाहीच्या पुनर्स्थापनेचे प्रयत्न
 • दिल्लीचे धरसोडीचे पंजाब धोरण
 • फेब्रुवारी १९९२ च्या निवडणुका
 • राष्ट्रपती राजवट ते लोकनियुक्त सरकार: लोकशाहीची पुनर्स्थापना
 • मागे वळून पाहताना
सरब जित सिंग

सरब जित सिंग आयएएस (निवृत्त) १९८७ ते १९९२ या काळात अमृतसरचे उपायुक्त होते. दहशतवादाशी सामना करताना दाखवलेली समर्पणवृत्ती आणि धैर्याबद्दल १९८९ साली त्यांना पद्मश्री सन्मान प्राप्त झाला आहे.

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in