Loading...
Image
Image
View Back Cover

पर्यावरणीय अर्थशास्त्र

सिद्धान्त आणि उपयोजन

 • अनिल शिशोदिया - इन्फर्मेशम/रेफरन्स सर्विसेस, डिपार्टमेंट ऑफ द कॅलगरी पब्लिक लायब्ररी, कॅलगरी, कॅनडा
 • कटार सिंह - माजी संचालक, इन्स्टिट्युट ऑफ रुरल मॅनेजमेंट, आणंद (आयआरएमए), गुजरात.

पर्यावरणीय अर्थशास्त्र : सिद्धान्त आणि उपयोजन म्हणजे पर्यावरणीय अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास असून; सामूहिक कृती, पर्यावरण धोरण आणि व्यवस्थापनाविषयी सिद्धान्तांवर यात विशेष भर आहे.

सिद्धान्त आणि सराव यांचा समतोल मेळ असलेल्या या पुस्तकात पर्यावरणीय अर्थशास्त्रातील अनेक मूलभूत संकल्पना, साधने, तंत्रे यांची ओळख करून देण्यात आली आहे. त्यांच्या आधारे वाचकाला पर्यावरण समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यांचे व्यवहार्य निराकरण करता येईलच, शिवाय धोरण आणि व्यवस्थापन यांची आखणीही करता येईल.

या पुस्तकाची इतर काही वैशिष्ट्ये आहेत. उदा.

 • संकल्पना, विषय आणि सिद्धान्त यांचे नावीन्यपूर्ण संश्लेषण;
 • सोप्या, सहज भाषेत आणि शैलीत मांडणी;
 • प्रत्यक्ष जीवनातील प्रसंगांवर आधारित स्पष्टीकरणे आणि उदाहरणे.
 • जागतिक तापमानवाढ, ओझोन थराचा ऱ्हास, आम्लाचा पाऊस आदी पर्यावरणीय समस्यांविषयी ताजी माहिती यात समाविष्ट आहे.

 • प्रस्तावना
 • परिचय
 • पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि विकास
 • मूलभूत संकल्पना आणि सिद्धान्त–वैयक्तिक निवडी
 • मूलभूत संकल्पना आणि सिद्धान्त–सामूहिक निवडी
 • पर्यावरणीय मूल्यांकन
 • पर्यावरणीय लेखांकन
 • पर्यावरणीय व्यवस्थापनाची साधने
 • जमीन आणि पर्यावरण
 • पाणी आणि पर्यावरण
 • वने आणि पर्यावरण
 • मत्स्योद्योग आणि पर्यावरण
 • जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरण
 • हवामान बदल आणि पर्यावरण
 • आदर्श पर्यावरण व्यवस्थापन धोरण
अनिल शिशोदिया

अनिल शिशोदिया सध्या कॅलगरी, कॅनडा येथे कॅलगरी सार्वजनिक ग्रंथालयामध्ये माहिती/संदर्भ सेवा विभागात काम करतात. ते पूर्वी सरदार पटेल विद्यापीठ (SPU), वल्लभ विद्यानगर, गुजरात येथे अर्थशास्त्र पदव्युत्तर विभागात वरिष्ठ व्याख्याता होते. ऑगस्ट १९९९ ते मे २००० या कालावधीमध्ये कोलोरॅडो राज्य विद्यापीठ, फोर्ट कॉलिन्स, यूएसए येथे पर्यावरणीय अर्थशास्त्रामध्ये ... अधिक वाचा

कटार सिंह

कटार सिंह सध्या, इंडिया नॅचरल रिसोर्स इकॉनॉमिक्स अँड मॅनेजमेंट (INREM) फाऊंडेशन, आणंद येथे मानद (संस्थापक) अध्यक्ष आहेत. ही नैसर्गिक संसाधन अर्थशास्त्र आणि पर्यावरण व्यवस्थापनाचे शिक्षण, प्रशिक्षण व संशोधनास प्रोत्साहन देण्यात आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन धोरणे आणि कार्यक्रमांतील सुधारणांसाठी कार्यरत असलेली एक बिगर शासकीय शैक्षणिक संस्था आहे. त्य ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in