Loading...
Image
Image
View Back Cover

सत्ता संपादन

भारतातील स्थिती

दोन्ही बाजूंनी पाहता, २०१४मधील लोकसभा निवडणूक राजकीय प्रचाराच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरली.

एका अतिशय वेगळ्या आणि प्रखर राजकीय प्रचाराची फलश्रुती आपल्याला १६ मे २०१४ रोजी पाहायला मिळाली. जे पराभूत झाले, त्यांनी या पराभवाचे खापर ‘मार्केटिंग’ प्रचारावर फोडले आणि हे लोकशाहीला प्रदूषित करते अशीही हाकाटी केली. याउलट ज्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपला मत दिले, त्यांच्यासाठी हा मोठा विजय ठरला.

‘सत्ता संपादनः भारतातील स्थिती’ हे पुस्तक अशा प्रचार मोहिमेचा, व्यूहरचनेचा आढावा घेते; या मोहिमा कशा उभ्या राहतात; स्थानिक नेत्यांची यात काय भूमिका असते; व्यक्ती आणि विचारधारा यांचा परस्परांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करते. भारतातील निवडणुकांचा चेहरा-मोहरा गेल्या अनेक वर्षांमध्ये कशा प्रकारे बदलत गेला आणि हल्ली राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यांपेक्षाही मीडिया आणि मार्केटिंग अधिक प्रभावी कसे ठरू लागले आहेत, याचा अचूक वेध हे पुस्तक घेते.

 • प्रस्तावना आणि ऋणनिर्देश
 • परिचय: २०१४ ची निवडणूक परिवर्तनात्मक होती का?
 • निवडणूक प्रचारमोहिमांतील स्वातंत्र्यप्राप्तीपासूनचे प्रवाह
 • युतीच्या पर्वाची सुरुवात
 • इंडिया शायनिंग मोहीम व तिचे अपयश
 • गुजरात दंगल आणि तत्कालीन सरकार
 • राजकीय चालनेसाठी काँग्रेसचा उच्चस्तरीय प्रचार
 • इंडिया अगेन्स्ट करप्शन, एका मोहिमेची उभारणी
 • नेतृत्वकेंद्रित निवडणूक मोहीम
 • निवडणूक प्रचारमोहीम व जाहीरनामा आणि राजकीय संदेशांची मार्मिक अभिव्यक्ती
 • निवडणूक प्रचारमोहिमेचे मूल्यांकन
 • राजकीय स्थित्यंतरातील सोशल मीडियाची भूमिका
 • भारतातील २०१४ च्या वैशिष्ट्यपूर्ण निवडणुका
 • राजकीय संज्ञापनाचा पुनर्शोध–मोदी अध्याय
 • समारोप: विचारसरणी-आधारित स्वप्नाचे विपणन
 • ताजा कलम: २०१५ बिहार विधानसभा निवडणुका–आघाडीच्या धर्माचे पुनरुज्जीवन
सुगातो हाजरा

सुगातो हाजरा, हे व्यवसाय व वैयक्तिक प्रतिमा व्यवस्थापनाचे सल्लागार आहेत. १९९८ पासून राजकीय मोहिमा हाताळण्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांच्याकडे आहे. अर्थशास्त्रात त्यांनी पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांच्याकडे बँकिंग, सरकार (प्रशासन), औद्योगिक संघटना व प्रसारमाध्यमे या क्षेत्रांतील ३० वर्षांपेक्षाही जास्त वर्षांचा अनुभवआहे. आर्थिक व धोरणात्मक ... अधिक वाचा

बिद्युत चक्रवर्ती

बिद्युत चक्रवर्ती हे सध्या भारतातील दिल्ली विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात अध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते दिल्ली विद्यापीठातील सामाजिकशास्त्र विभागाचे अधिष्ठाता व राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स; इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), कोलकाता; मोनाश युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रेलिया; नॅशन ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in