Login


स्वतःची करिअर घडवू इच्छिणाऱ्या युवतींमध्ये उद्यमशीलता आणि स्वयंओळख कशा प्रकारे विकसित होते, याचा अभ्यास हे पुस्तक करते.
अमूल्य कन्यारत्ने हे पुस्तक शहरी भागांतील युवतींच्या करिअरविषयक महत्त्वाकांक्षांचा वेध घेते. या मुली उच्च शिक्षणासाठी, नोकऱ्यांसाठी घराची चौकट ओलांडून बाह्यविश्वात येतात तेव्हा अनेक दूरगामी बदल घडवू लागतात. या बदलांचा किंवा संक्रमणांचा – लोकसंख्यात्मक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक – अभ्यास हा या पुस्तकाचा गाभा आहे. ज्यांच्या मातांना स्वतःची कारकिर्द घडवण्याची संधीही कोणी दिली नाही, अशा मुलींच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रथमदर्शी कथनाद्वारे एका नूतन आणि सार्वत्रिक आत्मविश्वासाची ओळख वाचकांना हे पुस्तक करून देते.
या करिअरकेंद्री मुली आपल्या समाजाबरोबर आणि एकूण जगाशी कशा प्रकारे व्यवहार करतात यावर भर देतानाच, पारंपरिक भूमिकांविषयीचे त्यांचे मत आणि समाजाचे त्यांच्याविषयीचे मत याचाही सविस्तर लेखाजोखा या पुस्तकात आढळतो.
- ऋणनिर्देश
- परस्परछेदी संक्रमणे
- पुरुषांमधील स्त्रियांचा इतिहास
- लैंगिकता आणि लोकसांख्यिक अभ्यास: विरोधाभासात्मक परिणाम
- शहरांतील व्यावसायिक महत्त्वाकांक्षा आणि शिक्षण
- प्रतिष्ठा वाढविणारा वडील–मुलगी प्रकल्प
- नवीन लैंगिकतेच्या काळातील शिकलेले प्रतिष्ठित
- अंतःस्थापित कर्तृत्व: फायदे, तोटे आणि भविष्यातील आशा
- सामाजिक पुनरुत्पादन आणि व्यावसायिक काल्पनिकता
- लैंगिक परिवर्तनाच्या दिशेने
अॅलिस डब्ल्यू. क्लार्क
अॅलिस डब्ल्यू. क्लार्क या इतिहासतज्ज्ञ आणि भारतातील लिंग आणि समाज या विषयाच्या अभ्यासक आहेत. त्यांनी सांता क्लारा विद्यापीठासहित सान फ्रान्सिस्को बे एरिया येथील अनेक विद्यापीठांमध्ये इतिहास आणि स्त्रियांचा अभ्यास शिकवला आहे. नुकत्याच त्या कॅलिफोर्निया– बर्कले विद्यापीठाच्या विस्तारित ऑनलाइन विभागात “भारतीय संस्कृती” या विषयाच्या अध्यापिका होत्य ... अधिक वाचा
PURCHASING OPTIONS
write to customerservicebooks@sagepub.in