Loading...
Image
Image
View Back Cover

मातृत्वाबद्दलच्या शंकाकुशंका

मातृत्वाबद्दलच्या शंकाकुशंका हे स्त्रीवादाचे सैद्धान्तीकरण या मालिकेतले चौथे पुस्तक आहे. भारतीय समाजाच्या आकलनासाठी मातृत्वाविषयीचे आकलन अत्यावश्यक आहे, या मुद्द्यावर या पुस्तकाचा भर आहे. भारत जागतिक भांडवली व्यवस्थेचा घटक बनल्यापासून मातृत्वाच्या संकल्पनेत आणि आचरणात बदल झालेला दिसून येतो.

या पुस्तकात मातृत्वाचे एक विचारधारा म्हणून आणि एक आचरण म्हणून विश्लेषण करण्यात आले आहे. मातृत्व आणि संगोपन यांच्यातली गुंतागुंत यांच्याविषयी चर्चा आहे. कारण या संकल्पना कितीही आदर्शवत मानल्या जात असल्या तरी महिलांचे समाजातील स्थान आजही गौणच आहे. यासंदर्भात भारतीय आणि परदेशी स्त्रीवाद्यांचे दृष्टिकोन काय आहेत, देवीमातांचे महत्त्व का असते, तंत्रज्ञानाचे विपरीत परिणाम, पुरुषसत्ताक समाजाचा दबाव (स्त्री माताच नव्हे, मुलाची माता असावी) अशा अनेक पैलूंचा हे पुस्तक वेध घेते. तसेच, महिलाविषयक अभ्यासाच्या मूलभूत संकल्पनांचा आणि जगाकडे पाहण्याच्या लिंगभेद दृष्टिकोनाचा परिचय करून देते.

  • मालिका संपादकांचे मनोगत मैत्रेयी कृष्णराज
  • प्रस्तावना
  • मातृत्वावरील स्त्रीवादी चर्चा
  • मातृत्व आणि पितृसत्ता
  • राष्ट्रवाद आणि राष्ट्र उभारणी
  • प्रजोत्पादन तंत्रज्ञान: भांडवलशाही पितृसत्तेखालील मातृत्व
  • समारोप
यशोधरा बागची

यशोधरा बागची (१९३७–२०१५) या जादवपूर विद्यापीठात महिला अभ्यास विभागाच्या गुणश्री प्राध्यापक होत्या. पश्चिम बंगाल महिला आयोगाच्या भूतपूर्व अध्यक्ष, स्कूल ऑफ विमेन्स स्टडीज, जादवपूर विद्यापीठाच्या भूतपूर्व संचालक, जादवपूर विद्यापीठात इंग्रजीच्या प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्या स्त्री अभ्यासाचा पाया घालणाऱ्या भारतातील अग्रगण्य विदुषी समजल् ... अधिक वाचा

Also available in:

PURCHASING OPTIONS

For shipping anywhere outside India
write to customerservicebooks@sagepub.in